R Madhavan च्या मुलाची पदक मिळवत दमदार कामगिरी, पालकांनी मुलांच्या करिअरमध्ये कशी साथ द्यावी

Khelo India Youth Games 2023: अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांत याने पुन्हा एकदा आपल्या वडिलांची मान उंचावेल असं काम केलं आहे. ‘खेलो इंडिया युथ गेम्स 2023’ मध्ये 7 पदके जिंकून वेदांतने कुटुंबाचा गौरव केला आहे. माधवनने सोशल मीडियावर मुलगा वेदांत आणि इतर सर्व खेळाडूंना विजयासाठी शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली आहे, त्यासोबतच त्याने मुलाचे काही फोटोही शेअर केले आहेत.

आर माधवन आणि त्याची पत्नी यांनी मुलाच्या करिअरसाठी काय तडजोड केली. किंवा पालक म्हणून आपली काय जबाबदारी असते हे जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock / R Madhavan)

मुलांना टीनएजमध्ये गुंतवून ठेवा

मुलांना टीनएजमध्ये गुंतवून ठेवा

मुलांना योग्य वयात गोष्टी मिळाल्या पाहिजेत. पौगंडावस्था हा मुलांमधील असा काळ असतो जेव्हा त्यांच्या शारीरिक आणि मानसिकतेमध्ये बदल होत असतो. अशावेळी त्यांना गुंतवून ठेवणं गरजेचं असतं. पण हे गुंतवण चांगल्या आणि त्यांच्या आवडीच्या गोष्टींमध्ये असणे आवश्यक आहे. हेच आर माधवनने आपल्या मुलाच्या बाबतीत केलं.

हेही वाचा :  धोका! किम जाँग उन यांचा अमेरिकेला इशारा, अण्वस्त्रांचा उल्लेख करत म्हणाले...

​(वाचा – ‘तो’ आईपण अनुभवणार, भारतातील पहिल्या ट्रान्स पुरूषाचे बाळंतपण, केरळमध्ये ट्रान्सजेंडर कपलने दिली Good News)​

पालक म्हणून तुम्ही काही निर्णय घ्यायला हवेत

पालक म्हणून तुम्ही काही निर्णय घ्यायला हवेत

अनेकदा आपण सामान्य कुटुंबात पाहतो. मुलांसाठी किंवा मुलांच्या चांगल्याचे निर्णय ते घेऊ शकत नाही. पण ते घ्यायला हवेत. जसे की, आम्ही मुलासाठी दुबईला राहण्याचा निर्णय घेतला. हा खूप मोठा निर्णय असला तरीही तो माझ्या मुलाच्या करिअरसाठी चांगला आहे.

(वाचा – शास्त्रज्ञांनी सांगितला मुलांच्या संगोपनाचा उत्तम पर्याय, हे केलात तर टेन्शन फ्री व्हाल)​

मुलांच्या आवडी निवडी ओळखा

मुलांच्या आवडी निवडी ओळखा

मुलाचं करिअर करणे सोपी गोष्ट नाही. पण त्यांची आवड पालक म्हणून तुम्हाला कळायला हवी. अशावेळी तुम्ही लहानपणापासून त्यांच्यासोबत किती वेळ घालवता हे अतिशय महत्वाचं आहे. कारण यामुळेच तुम्हाला त्यांची आवड सहज कळू शकेल.

(वाचा – पायलट लेकीने वडिलांचा आशिर्वाद घेत उडवलं विमान, तरूणीच्या व्हिडीओने सगळ्यांचेच पाणावले डोळे)​

पालकांच एक मत महत्वाचं

पालकांच एक मत महत्वाचं

मुलांच करिअर घडवत असताना पालकांच एकमत असणं गरजेचं आहे. कारण करिअर घडवणं ही सोपी गोष्ट नाही. अशावेळी पालकांना अनेक गोष्टींची तडजोड करावी लागते. कारण कोणताही मोठा निर्णय मुलाबाबत घेताना पालकांनी एकत्र असणे गरजेचे आहे. यामुळे त्याला दोन्ही पालकांचा सपोर्ट आणि प्रेम दोन्ही मिळतं.

हेही वाचा :  चीन समर्थक नेत्यानं निवडून आल्यानंतर घेतला भारताशी पंगा; भारतीय लष्कराबद्दल वादग्रस्त विधान

(वाचा – सत्यजित तांबे यांचं लेकीकडून कौतुक, बाप-लेकीचं नातं असावं तर असं)​

काळजी करू नका तर काळजी घ्या

काळजी करू नका तर काळजी घ्या

पालक म्हणून मुलाच्या भविष्याची चिंता ही राहणारच. पण याची चिंता, काळजी न करता मुलांच्या शिक्षणाकडे, करिअरकडे आणि संगोपनाकडे सकारात्मकपणे पाहा. मुलांची आवड जेव्हा करिअर बनतं तेव्हा त्याचा आनंद मुलांनाही मिळतो आणि पालकांनाही.

​(वाचा – C-Section नंतर शरीराचा प्रत्येक अवयव तुटून पडतो, डॉक्टरांनी सांगितली कशी बिघडते नव्या आईची तब्बेत)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ठाणे पालिकेतील सफाई कर्मचारी महिलेचा मुलगा बनला अधिकारी, UPSC साठी ‘अशी’ केली तयारी

UPSC Success Story: आपल्या मुलाने चांगल शिक्षण घेऊन मोठा अधिकारी व्हावं असं प्रत्येक आईला वाटत …

चंद्र एकाच जागी स्थिरावणार; तब्बल इतक्या वर्षांनी आकाशात दिसणार भारावणारं दृश्य

Lunar Standstill : चंद्र… इथं पृथ्वीवर प्रेमाच्या आणाभाकांपासून खगोलीय घटनांपर्यंत महत्वाच्या भूमिकांमध्ये आणि रुपांमध्ये हा …