पुण्यात पिण्याच्या पाण्याचा मुद्दा पेटणार, ‘या’ भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

पुणे : Water News Pune : पुणेकरांचे पाणी महागण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागाने तब्बल 5 पटीने पाण्याचे दर वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत पुण्यात पाण्याचा मुद्दा पेटणार असे दिसत आहे. (Pune water price hike) प्रति 1000 लीटरसाठी 30 पैसे इतकी पाणीपट्टी होती. आता नव्या प्रस्तावित दरानुसार 1000 लीटरसाठी दीड रूपया मोजावा लागेल. 

पुणे शहरात ‘या’ भागातील पाणीपुरवठा बंद

दरम्यान, पुण्यात दोन दिवस पाणीपुरवठा (Water supply ) बंद राहणार आहे. (Pune water supply cut off) लष्कर जलकेंद्राच्या भागातील सोमवार पेठ ते नरपतगिरी चौक ते 15 ऑगस्ट चौक तर लष्कर पाणीपुरवठा जलकेंद्र अंतर्गत रामटेकडी मुख्य जलवाहिनीचे काम करण्यात येणार आहे. गुरुवारी दि. 24 फेब्रुवारी रोजी हडपसर परिसरासह, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, कोरेगाव पार्क मुंढवा भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच लष्कर जलकेंद्रअंतर्गत रामटेकडी विभागामधील संपूर्ण परिसरात पाणी बंद राहणार आहे.

तसेच शुक्रवार 25 फेब्रुवारी रोजी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. लष्कर जलकेंद्रअंतर्गत जलमंदिर विभागामधील संपूर्ण परिसरातील जीई साऊथ, जीई नॉर्थ, पुणे कॅन्टोनमेंटचा हद्दीचा सर्व भाग, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, ताडीवाला रोड परिसर, कोरेगाव पार्कचा संपूर्ण भाग, पुणे स्टेशन परिसर, ससून हॉस्पिटल परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसर, गणेशखिंड रोड आणि परिसर, पाटील इस्टेट, शिवाजीनगर इत्यादी भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

हेही वाचा :  बाळासाहेबांची शिवसेनामध्ये चाललंय काय?, मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, 'स्वकियांकडूनही कुरघोड्या'

Pune water supply cut off : संपूर्ण रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया, सय्यदनगर हेवन पार्क, गोसावी वस्ती, शंकर मठ, वैदूवाडी, रामनगर, आनंदनगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळेनगर ससाणेनगर, काळेपडळ, मुंडबा, माळवाडी, सोलापूर रोड डावीबाजू, केशवनगर, मांजरी बुद्रुक, शेवाळेवाडी, बी.टी. कुबडे रोडवरील काही परिसर, भीमनगर, बालाजीनगर, विकासनगर, ओरीयंट गार्डन साडेसतरानळी, महंमदवाडी रस्ता, उजवीकडील संपूर्ण भाग, संपूर्ण हांडेवाडी रोड, फुरसुंगी, उरुळी देवाची, भेकराईनगर, मंतरवाडी, ओताडेवाडी आदी ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

10 कोटी 74 लाखाची व्हेल माशाची उलटी जप्त; कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई

Kolhapur Crime News : कोल्हापूर मधील आजरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पाठलाग करत तब्बल …

पोपटांनतर आता अजगर, मगर; संजय राऊत म्हणतात ‘भाजप’ सोबत आलेल्यांना खाऊन टाकतो

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पोपटावरुन कलगीतुरा रंगला होता. आता महाराष्ट्राच्या राजकारणात अजगर आणि मगर …