prakashache ang book by antoni parera zws 70 | समाजाविषयीचे मुक्त चिंतन


जीवनाविषयीचे सखोल चिंतन करणाऱ्या या लेखांमधून विविध लेखांचे, गोष्टींचे दाखले लेखक देतो.

‘प्रकाशाचे अंग’ हे अ‍ॅन्थनी परेरा यांचे पुस्तक म्हणजे लेखकाच्या चिंतनशील मनोवृत्तीचे मनोज्ञ दर्शन होय. लेखकाला गोरगरीबांविषयी असलेली कणव, सर्वधर्मसमभाव वृत्ती आणि लेखकाच्या जीवनानुभवावरचे सखोल चिंतन असेच या पुस्तकाचे स्वरूप आहे.

जीवनाविषयीचे सखोल चिंतन करणाऱ्या या लेखांमधून विविध लेखांचे, गोष्टींचे दाखले लेखक देतो. या उदाहरणांमधून लेखकाचे जीवनाविषयीचे चिंतन किती गहन आहे याची प्रचीती येते. विशेष म्हणजे हे चिंतन कोरडे, पुस्तकी शहाणपण नाही. त्या चिंतनात सच्चेपणा आहे, समजाविषयीची कणव आहे.

‘बोलींचा बहर’ हा बोली भाषांवरील खूप सुंदर लेख आहे. या लेखात विविध बोली भाषांचा धांडोळा घेताना बोली भाषांमधली उत्तम गाणी उध्दृत केली आहेत- ती नाविण्यपूर्ण आहेत.

प्रार्थना म्हणजे परमेश्वराला निमंत्रण, परमेश्वराचा केलेला पुकार..  प्रार्थनेचे मर्म उलगडणारा ‘तुझ्या इच्छेप्रमाणे होवो!’ हा लेख उत्तम! ‘वार्धक्यातील सौंदर्य’ या लेखात मनाचं तरुणपण टिकवून ठेवण्यासाठी काय करता येईल याविषयचे मार्गदर्शन करणारे चिंतन आहे. जीवनातलं माणसांचं, पुस्तकांचं आणि निसर्गाचं महत्त्व अधोरेखित करणारा लेखही उत्तम आहे. जीवनाविषयीचे तत्त्वज्ञान भरभरून सांगणारे असे हे पुस्तक आहे. ‘प्रकाशाचे अंग’ -अ‍ॅन्थनी परेरा, कोमल प्रकाशन, पाने-१३६ , किंमत- २०० रुपये.

हेही वाचा :  'मोदी जात आहेत', ठाकरे गटाचा दावा! म्हणाले, 'भाजपा अन् त्यांच्या 2 बनावट पंपन्यांनी..'Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Anti Paper Leak Law: मोठी बातमी! पेपरफुटीला बसणार आळा; सरकारने मध्यरात्री नवा कायदा केला लागू

What is Anti Paper Leak Law: युसीजी नेटचा पेपर लीक झाल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात …

धावत्या स्कूल व्हॅनचा मागचा दरवाजा उघडला आणि… काळजचा थरकाप उडवणारा Video

School Van Incident CCTV : शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि स्कूल व्हॅनसाठी (School …