पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये गुंतवा इतके पैसे, पाच वर्षात मिळतील १० लाख रुपये; जाणून घ्या

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये गुंतवा इतके पैसे, पाच वर्षात मिळतील १० लाख रुपये; जाणून घ्या

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये गुंतवा इतके पैसे, पाच वर्षात मिळतील १० लाख रुपये; जाणून घ्या

पोस्ट ऑफिसच्या ६० वर्षांवरील लोकांसाठी चालवल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये पोस्ट ऑफिस ७.४ टक्के दराने व्याज देते.

पोस्ट ऑफिस सर्व वर्ग आणि वयोगटातील लोकांसाठी बचत योजना चालवते. या योजनांमध्ये लोकांची गुंतवणूक सुरक्षित तर आहेच शिवाय चांगला परतावाही मिळतो. पोस्ट ऑफिसच्या ६० वर्षांवरील लोकांसाठी चालवल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये पोस्ट ऑफिस ७.४ टक्के दराने व्याज देते. तुम्हालाही ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक करायची असेल, तर त्याचे तपशील जाणून घ्या.

SCSS योजनेत गुंतवणूक करण्याचे नियम

पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमचे वय ६० वर्षे असणे आवश्यक आहे. तुम्ही वयाच्या ५५ ​​व्या वर्षी VRS घेतले असले तरीही तुम्ही पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक करू शकता. या पोस्ट ऑफिस योजनेतील गुंतवणूक किमान १००० हजार रुपयापासून सुरू केली जाऊ शकते आणि त्याचा लॉक कालावधी ५ वर्षांचा आहे. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत जास्तीत जास्त गुंतवणूक १५ लाखांपेक्षा जास्त असू शकत नाही.

हेही वाचा :  LPG Cylinder Price Hike : अमूल दुधानंतर एलपीजीला महागाईचा फटका; गॅस सिलेंडरच्या किमतीत १०५ रुपयांची वाढ

८ लाखांच्या गुंतवणुकीवर १०.९६ लाख रुपये होतील उपलब्ध

पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक योजनेत तुम्ही एकरकमी ८ लाख रुपये जमा केल्यास, तुम्हाला वार्षिक ७.४ टक्के चक्रवाढ व्याज मिळेल. ज्यामध्ये तुम्ही ५ वर्षात केलेली गुंतवणूक १० लाख ९६ हजार रुपये होईल. अशा स्थितीत तुम्हाला ५ वर्षांत २ लाख ९६ हजार रुपयांचा नफा मिळेल.

SCSS योजनेत आहे कर सूट उपलब्ध

सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीममध्ये तुमचे वार्षिक व्याज १०,०००रुपयापेक्षा जास्त असल्यास, TDS कापला जातो. दुसरीकडे, या योजनेत गुंतवणूक केल्यास आयकर कलम ८०C अंतर्गत सूट मिळते. याशिवाय पती-पत्नी दोघेही ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत संयुक्त खाते उघडू शकतात. परंतु या खात्यात जास्तीत जास्त १५ लाख रुपयेच गुंतवले जाऊ शकतात.

जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक खाते ५ वर्षापूर्वी बंद केले, तर तुमच्या ठेवीतील १.५% रक्कम १ वर्षात कापली जाईल. तर तुम्ही २ वर्षांनी ते बंद केले तर ठेव रकमेतील १ % कपात केली जाईल.

Loksatta Telegram

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …