Karnataka Elections: ‘वोट फ्रॉम होम’साठी परवानगी, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; पण मतदान करायचं कसं?

Karnataka Elections 2023: कर्नाटक विधानसभा निवडणूक (Karnataka Assembly Elections) जिंकण्यासाठी सध्या भाजपा (BJP) आणि काँग्रेसकडून (Congress) जोरदार प्रयत्न सुरु आहेत. दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते कर्नाटकात ठाण मांडून बसले असून, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. दरम्यान, दुसरीकडे निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने घरातून मतदान (Vote From Home)करण्याची परवानगी दिली आहे. 

निवडणूक आयोगाने ‘वोट फ्रॉम होम’साठी परवानगी दिली असून तशी घोषणा केली आहे. पण ही सोय फक्त दिव्यांग आणि 80 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठीच दिली आहे. यासह निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरने मतदान करण्याची घोषणा केली आहे. निवडणूक आयोग आणि मतदान अधिकाऱ्यांची एक टीम संबंधित मतदारांच्या घरी जाईल आणि त्यांचं मत नोंदवून घेईल. 29 एप्रिल ते 6 मे दरम्यान ही प्रक्रिया पार पडणार आहे. 

निवडणूक आयोगाने 80 वर्षांहून अधिक वय असणारे ज्य़ेष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना घऱातून मतदान करण्याची परवानगी दिली आहे. घरातून गुप्तपणे मतदान करण्यासाठी त्यांना मतपत्रिका दिली जाईल. मतदान प्रक्रिया पार पडत असताना एक मतदान अधिकारी, एक मायक्रो ऑब्जर्वर, व्हिडीओग्राफर आणि पार्टी एजंटसह स्थानिक पोलीस उपस्थित राहतील. 

हेही वाचा :  Top 5 Small Cap Funds: तीन वर्षात तिप्पट कमाई! SIP मध्ये गुंतवणूक करण्याची हीच सुवर्णसंधी

बॅलेट मतदान प्रक्रिया तैनात कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली होईल. तसंच मतदान संपल्यानंतर हे बॅलेट बॉक्स स्ट्राँग रुममध्ये पाठवले जातील. यानंतर 13 मे रोजी या मतांची मोजणी केली जाईल. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

स्क्रॅप माफिया ते करोडपती, आता साम्राज्य संकटात… कोण आहे गँगस्टर रवी काना?

स्क्रॅप माफिया रवी कानाला पकडण्यात भारतीय पोलिसांनी यश मिळालंय. पश्चिम उत्तर प्रदेशातील फरारी गुंड रवी नागर …

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …