पॅरामेडिकल विद्यार्थी विद्यावेतनापासून वंचित

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

वैद्यकीय, दंत, बीएएमएस अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या बरोबरीने रुग्णालयात इंटर्नशिप कालावधीत रुग्णसेवा देऊनही बीएससी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना कोणतेही विद्यावेतन देण्यात येत नाही. याबाबत विद्यार्थ्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी सरकारकडून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत विद्यार्थ्यांमध्ये दुजाभाव केला जात असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

राज्यात बीएससी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम १७ शासकीय मेडिकल कॉलेजांमध्ये शिकविला जातो. दरवर्षी या अभ्यासक्रमाला ११८६ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. प्रयोगशाळा तंत्रज्ञान, रेडिओग्राफी, रेडिओ थेरपी, शस्त्रक्रिया विभाग, ऑप्टोमेट्री, कम्युनिटी मेडिकल, कार्डिओलॉजी, न्युरोलॉजी, फॉरेन्सिक औषध, रक्त संक्रमण, एंडोस्कोपी, आपत्कालीन औषध तंत्रज्ञान आदी अभ्यासक्रम यामध्ये शिकविले जातात.

चार वर्षांच्या अभ्यासक्रम कालावधीत विद्यार्थ्यांना एक वर्ष रुग्णालयात इंटर्नशिप करणे बंधनकारक असते. रुग्णालयातील अपघात आणि बाह्यरुग्ण विभागात हे विद्यार्थी रुग्णसेवा देतात. या विद्यार्थ्यांची रुग्णाला तातडीची रुग्णसेवा देण्यात मोठी मदत होते.

सरकारकडून एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप कालावधीत रुग्णसेवा केल्याचा मोबदला म्हणून दरमहा ११ हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. मात्र एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांच्या जोडीने रुग्णालयात विविध पातळ्यांवर सेवा देणारे बीएससी पॅरामेडिकलचे विद्यार्थी मात्र मागील १० वर्षांपासून यापासून वंचित आहेत. बहुतांश विद्यार्थी ग्रामीण आणि दुर्गम भागातून या अभ्यासक्रमाला येतात. शिक्षणाबरोबरच कर्तव्य म्हणून ते इंटर्नशिप कालावधीत डॉक्टरांच्या जोडीने रुग्ण सेवा देतात. मात्र या विद्यार्थ्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून मागणी करूनही अद्याप सरकारने विद्यावेतन सुरू केले नसल्याची स्थिती आहे.

हेही वाचा :  खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत विविध पदांची भरती

याबाबत राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांनी फेब्रुवारी, २०२१मध्ये या विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिले जावे, अशी शिफारस सरकारकडे केली होती. मात्र गेल्या दोन वर्षांत याबाबत सरकारकडून कोणताही निर्णय झाला नाही.

‘पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांनी करोनाकाळातही जीवाची पर्वा न करता डॉक्टरांच्या जोडीने रुग्ण सेवा दिली. गेल्या कित्येक वर्षांपासून पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप कालावधीत विद्यावेतन देण्याची मागणी करत आहोत. मात्र अद्यापही त्यावर कोणताच निर्णय घेतला नाही. तसेच विद्यार्थ्यांना वसतिगृहही मिळत नाही. हीच परिस्थिती राहिल्यास सरकारने पॅरामेडिकलचे शिक्षण बंद करावे’, अशी भावना विद्यार्थी महेंद्र भोये याने व्यक्त केली आहे.

Earn and Learn Scheme: विद्यार्थ्यांच्या मानधनात वाढ

‘आमचे दररोज सुमारे १२ ते १३ तास काम’

‘इंटर्नशिप काळात काही विभागांतील विद्यार्थी १२ ते १३ तास काम करतात. रेडिओग्राफी, प्रयोगशाळा आणि ओटी या रुग्णालयातील विभागात नियमित कर्मचाऱ्यांपेक्षा इंटर्नशिप करणारे विद्यार्थी अधिक काम करतात. मात्र आम्हाला कोणतेही विद्यावेतन मिळत नाही. करोना काळातही आम्ही धोका पत्करून सेवा दिली. मी स्वतः तीन वेळा करोनाबाधित झाले. मात्र रुग्णसेवा थांबवली नाही. पॅरामेडिकलचे विद्यार्थी वैद्यकीय सेवेतील विद्यार्थ्यांप्रमाणेच सेवा बजावतात. त्यामुळे सरकारने पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांनाही करोनाकाळापासून विद्यावेतन लागू करावे’, अशी मागणी बीएससी पॅरामेडिकल स्टुडंट वेल्फेअर आसोसिएशनची सचिव स्नेहा साळेकर यांनी केली.

हेही वाचा :  Success Story: जन्मताच अंधत्व मिळालेल्या डोळ्यांनी पाहिले स्वप्न,९व्या प्रयत्नात नागेद्रन बनला IAS अधिकारी

पदवी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने
Marathwada University Exam: पेपर सुरु झाले तरी प्रवेशपत्र मिळेना, परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांचा गोंधळ

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …