ओटीटीवर घरबसल्या पाहा ‘हे’ देशभक्तीपर चित्रपट

Republic Day 2023 : आज 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) आहे.  आज देशभरात प्रजासत्ताक दिनाचा  उत्साह पाहायला मिळत आहे. आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. देशभक्तीपर चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळत असते. प्रजासत्ताक दिनाला तुम्ही घरबसल्या ओटीटीवर देशभक्तीवर आधारित चित्रपट (Patriotic Movies) पाहू शकता.  या चित्रपटामधील काही सीन पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे येतात.

कोहराम (Kohram) 

1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या कोहराम या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट तुम्ही युट्यूबवर पाहू शकता. 

अब तुम्हारे हवाले वतन साथियों (Ab Tumhare Hawale Watan Saathiyo)

अब तुम्हारे हवाले वतन साथियों या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाला  प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच अक्षय कुमार आणि बॉबी देओल यांनीही देखील महत्वाची भूमिका साकारली.  झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक हा चित्रपट पाहू शकता. 

हेही वाचा :  वय अवघं 28 वर्षे अन् कोट्यवधींची मालकीण! आलिया भट्टची ‘लक्झरी लाईफ’ पाहिलीत?

देश प्रेमी (Desh Premee)

1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या देश प्रेमी हा चित्रपट लोक आजही आवडीनं बघतात.   ‘मेरे देशप्रेमियों आपस में प्रेम करो’ या देश प्रेमी चित्रपटातील गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी दुहेरी भूमिका साकारली आहे. हा चित्रपट तुम्ही झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. 

news reels New Reels

‘मिशन मजनू’  (Mission Majnu) 

सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘मिशन मजनू’  या सिनेमाला सोशल मीडियावर संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. शंतनू बागचीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात सिद्धार्थसह रश्मिका मंदान्ना महत्त्वाच्या भूमिकेत आहे. नेटफ्लिक्सवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. 

राझी (Raazi)

राझी या हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज झाला.  या चित्रपटामध्ये आलिया भट्टनं एका सिक्रेट एजंटची भूमिका साकरली आहे. या चित्रपटामधील आलियाच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर प्रेक्षक पाहू शकतात. 

शेरशाह (Shershaah)

शेरशाह या चित्रपटामध्ये कॅप्टन विक्रम बत्रा ही भूमिका अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानं साकारली आहे. या चित्रपटाचं कथानक कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित आहे. प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.  

हेही वाचा :  'वेड' ला प्रेक्षकांची पसंती; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Patriotic Movies : ‘शेरशाह’ ते ‘चक दे इंडिया’ ; ‘या’ चित्रपटामधील सीन पाहून येतील अंगावर शहारे

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …