OLA कंपनीकडून कपातीची घोषणा, २०० कर्मचाऱ्यांना मिळणार डच्चू

Ola LayOff: राइड-शेअरिंग कंपनी ओलाने आपल्या टेक आणि प्रोडक्ट टीममधून सुमारे २०० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. मनीकंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार, ही कपात म्हणजे आपल्या रिस्ट्रक्चरिंगचा एक भाग असल्याचे कंपनीने आहे. जगभरात तंत्रज्ञान कंपन्यांवर दबाव वाढला आहे, त्यामुळे ही कपात केली जात असल्याचे अहवालातून समोर आले आहे.

ओला कॅब, ओला इलेक्ट्रिक आणि ओला फायनान्शियल सर्व्हिसेस वर्टिकलमधील कर्मचाऱ्यांना नोकरी सोडून जाण्यास सांगितले जात आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला कपातीला सुरू झाल्यानंतर कंपनीने नोटिस कालावधीनुसार पॅकेज ऑफर केले. नियामक फाइलिंगनुसार, FY21 मध्ये, कंपनीच्या महसुलात ६५ टक्क्यांनी घट होऊन ६८९.६१ कोटी रुपये झाले.

ओला कंपनीची प्रतिक्रिया

ओलाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ कंपनीच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी आम्ही नियमितपणे रिस्ट्रक्चरिंगचा अभ्यास करत आहोत.’ आम्ही प्रमुख प्राधान्य क्षेत्रातील वरिष्ठ प्रतिभांचा शोध घेत आहोत. अभियांत्रिकी आणि डिझाइनमध्ये नावीन्य आणणे सुरू ठेवू. काही महिन्यांपूर्वी ओलाने २०० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना रद्द केली होती.

महाराष्ट्र डिजिटल विद्यापीठासंदर्भात महत्वाची अपडेट

जगभरातील अनेक कंपन्यांकडून काम बंद

जगभरातील कंपन्यांमध्ये कपातीचे सत्र सुरु आहे. काही दिवसांपूर्वी Amazon ने १८ हजार नोकऱ्या कपातीची घोषणा केली होती. गुंतवणूक क्षेत्रातील दिग्गज गोल्डमन सॅक्सने जगभरात मोठ्या प्रमाणावर कपात सुरू केली आहे. कंपनीच्या नफ्यात सातत्याने घट होत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीच्या या कपातीमुळे ३,२०० कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे. ही कपात बँकांनी यावर्षी केलेली सर्वात मोठी कपात आहे.

२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची होणार भरती, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
हेही वाचा :  रेल्वे भर्ती बोर्ड (RRB ALP) अंतर्गत असिस्टंट लोको पायलट पदांची भरती

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …