Odisha Accident नंतर भारतीयांना वाटतीये ट्रेन प्रवासाची भिती? Ticket Cancellations च्या काँग्रेसच्या दाव्यावर IRCTC चा रिप्लाय

Ticket Cancellations Odisha Train Accident: ओडिशामधील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या रेल्वेच्या भीषण अपघातासंदर्भात काँग्रेसने केलेला दावा इंडियन रेलवे कैटरिंग अ‍ॅण्ड टूरिज्म कॉर्पोरेशनने म्हणजेच IRCTC ने खोडून काढला आहे. ओडिशामध्ये कोरामंडल एक्सप्रेसला (Coromandel Express) भीषण अपघात (Odisha Train Accident)  झाल्यानंतर 275 प्रवाशांचा मृत्यू झाल्यापासून हजारो प्रवाशांनी आपली रेल्वेची तिकीटं रद्द केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. IRCTC ने काँग्रेसकडून करण्यात आलेल्या दाव्यावर ट्वीटरवरुन रिप्लाय दिला आहे. काँग्रेसचा दावा चुकीचा असून तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढलेली नाही असं IRCTC चं म्हणणं आहे.

काँग्रेसने भाजपाला केलं लक्ष्य

ओडिशामधील बालासोरमध्ये 3 ट्रेनचा भीषण अपघात झाला. त्यानंतर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. अगदी परदेशातील प्रमुख नेत्यांनाही यासंदर्भात आपल्या सहवेदना व्यक्त केल्या. या अपघातामधील जखमी प्रवाशांची संख्या 1100 हून अधिक आहे. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर निशाणा साधला. ओडिशामधील काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री भक्त चरण दास यांनी पत्रकार परिषद घेऊन या अपघाताच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारला लक्ष्य केलं.

हेही वाचा :  ऑनलाईन तिकीट बुक करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आता 'हा' चार्ज द्यावा लागणार नाही, IRCTC ची घोषणा

तिकीटं रद्द करण्याचं प्रमाण वाढल्याचा दावा

मागील काही काळापासून एवढ्या मोठ्या प्रमाणात प्राणहानी झालेली रेल्वे दुर्घटना कधीच घडली नाही. शेकडो लोकांनी या अपघातामध्ये प्राण गमावला आहेत तर एक हजाराहून अधिक प्रवासी यात जखमी झालेत. या अपघातामुळे सर्वांनाचा दु:ख झालं आहे असं भक्त चरण दास म्हणाले. इतकेचं नाही तर त्यांनी या अपघातानंतर मोठ्याप्रमाणात लोकांनी रेल्वेची तिकीटं रद्द केल्याचा दावा केला आहे. आता ट्रेनचा प्रवास सुरक्षित वाटत नाही असं लोकांना वाटत आहे, असंही ते म्हणाले. काँग्रेसने भक्त चरण दास यांनी केलेल्या या दाव्यांचा पत्रकारपरिषदेतील व्हिडीओ पोस्ट केला आहे.

IRCTC चं म्हणणं काय?

काँग्रेसने केलेल्या या ट्वीटला IRCTC ने रिप्लाय केला आहे. काँग्रेसचं ट्वीट कोट करुन रिट्वीट करताना पक्षाने तिकीट रद्द करण्यासंदर्भातील दावा चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. “तपशीलवार माहितीनुसार हा दावा चुकीचा आहे. तिकीटं रद्द करण्याचं प्रमाण वाढलेलं नाही. या उलट तिकीटं रद्द करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. 1 जून रोजी ही संख्या 7.7 लाख होती जी 3 जून रोजी 7.5 लाख इतकी आहे,” असं IRTC ने म्हटलं आहे.

नेमका कसा झाला अपघात?

कोरामंडल एक्सप्रेसने (Coromandel Express) लूप लाइनवरील मालगाडीला धडक दिली. त्यामुळे या गाडीचे डबे बाजूच्या मार्गिकेवर पडले. दुसऱ्या बाजूने येणाऱ्या बंगळुरु-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेसने (Bengaluru-Howrah Superfast Express) या डब्ब्यांना धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. मागील अडीच दशकामध्ये भारतात झालेला हा सर्वात भीषण रेल्वे अपघात ठरला आहे. येथील रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी 51 तासांचा अवधी लागला.

हेही वाचा :  ‘जामिनावर सुटका हवी असेल तर ३ कोटी द्या,’ नवाब मलिक यांच्या पुत्राला निनावी फोन, गुन्हा दाखलSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

भारतीयांची स्वप्नपूर्ती! ढगांवर तरंगणाऱ्या चिनाब पुलावर रेल्वेची यशस्वी ट्रायल; रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ

Chenab Railway Bridge : कोट्यवधी देशवासीयांचं स्वप्न आता साकार होणार आहे. जगातील सर्वात उंच ब्रिज …

महाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्ती

Sangali News : कन्नड आणि उर्दु शाळांमध्ये चक्क मराठी माध्यमिक शिक्षकांचे नियुक्ती करण्याचा अजब कारभार …