ना उम्र की सीमा हो..! ‘मी 40 वर्षांची तो 15…’ फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीने सांगितली LOVE STORY

Emmanuel Macron Love Story : प्रेम कधी आणि कोणावर होईल यांची कोणीही कल्पनाही करु शकतं नाही. प्रेम ना वय बघतं ना धर्म…प्रेमात फक्त मन बघितलं जातं. या प्रेमावर एक सुंदर गझल अशा वेळी आठवते. न उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन, जब प्यार करे कोई, तो देखे केवल मन…आज आपण अशी एक प्रेम कहाणीबद्दल जाणून घेणार आहोत. जी चित्रपटापेक्षाही भारी आहे. (Trending News I am 40 years old and he is 15 French Presidents emmanuel macron wife brigitte LOVE STORY viral now)

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची ही प्रेम कहाणी आहे. त्यांच्या प्रेमाबद्दल खुद्द त्यांच्या पत्नी फर्स्ट लेडी ब्रिजेट यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. मॅक्रॉन हे वयाच्या 39 व्या वर्षी त्यांनी निवडणूक जिंकून सर्वांत तरुण राष्ट्राध्यक्ष बनण्याचा मान त्यांनी पटकावला आहे. 

ना उम्र की सीमा हो..!  

मॅक्रॉन यांची पत्नी ब्रिजेट यांनी या लव्हस्टोरीबद्दल एका मुलाखतीत सांगितलं. त्या म्हणाल्या की, जेव्हा मी मॅक्रॉनला डेंटिंग करण्याची सुरुवात केली तेव्हा मला भविष्याची खूप काळजी होती. शाळा सोडल्यानंतर मॅक्रॉन त्याच्या वयाच्या मुलीच्या प्रेमात पडेल अशी मला भीती होती. माझं डोक या विचाराने खराब झालं होतं की, इतक्या लहान मुलाच्या प्रेमात मी पडली आहे. ही गोष्ट माझ्यासाठी खूप गंभीर होती. मॅक्रॉनला पॅरिस जायचं होतं. तेव्हा मीच त्याला सांगितलं होतं तुझ्या वयाच्या मुलीच्या प्रेमात पड. पण असं झालं नाही. आमच्या दोघांच्या वयात मोठा फरक होता. या नात्याबद्दल सांगताना ब्रिगेटी म्हणाल्या की, आपल्या आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला आवश्यक ऑप्शनची निवड करावी लागते. 

हेही वाचा :  महाविकास आघाडीचा सातबारा कुणाचा? कसेल त्याची जमीन, जिंकेल त्याची जागा

पहिल्यांदा जेव्हा भेटलो तेव्हा…

त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगताना त्या म्हणाल्या की, मी कॅथोलिक प्रॉव्हिडन्स स्कूलमध्ये नाटकाचं वर्ग घेत होती. त्यावेळी माझी मुलगी मॅक्रॉन यांची वर्गमैत्रीण होती. त्यावेळी मी 40 वर्षांची होती आणि मॅक्रॉन 15 वर्षांचे होते. त्यानंतर ते दोघे प्रेमात पडले आणि जगाला याची भनक लागली तेव्हा या प्रेमाला स्कँडलचं नाव देण्यात आलं. 

फ्रान्समध्ये सहमतीने नातं ठेवण्याचं वय हे 15 वर्षांचं आहे. यामध्ये शारीरिक अत्याचार आणि बलात्काराचा समावेश नाही. मॅक्रॉन यांच्या पालकांनी पॅरीसमध्ये बोर्डिंग शाळेत पुढील शिक्षणासाठी पाठवलं. आता या दोघांमध्ये वयासोबत शहराचं अंतरही आलं होतं. या दुरावाने देखील त्या दोघांचं प्रेम कमी झालं नाही. पॅरीस सोडल्यानंतर ब्रिगेटीने ड्रामा क्लास बंद केला. त्या लॅटिन क्लास घेण्यास सुरुवात केली. मॅक्रॉनच्या प्रेमात असताना ब्रिगेटी या विवाह होत्या पण त्या नवऱ्यापासून विभक्त झाल्या होत्या. आता आपल्या प्रेमाबद्दल मुलांना कसं सांगायचं या चिंतेत त्या होत्या. 

मी मॅक्रॉन यांनी लग्नासाठी तब्बल 10 वर्षे वाट पाहिली आहे. कारण माझ्या प्रेमामुळे माझ्या मुलांना कुठलीही अडचण येऊ नये असं मला वाटतं होतं. कारण माझी मुलं ही मॅक्रॉनच्या वयाच्या आसपास होती. त्यामुळं या नात्यामुळे माझं आणि त्यांचं आयुष्य उद्धवस्त होऊ नये म्हणून बराच वेळ घेतला. हे पण खरं होतं की, मला माझं सुंदर आयुष्यही हवं होतं. मी मॅक्रॉनशी लग्नाचा निर्णय घेतला नसता आज मी आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण गमावले असते. खरं तर मी मुलांसोबत आनंदी होते पण त्या आनंदात मला मॅक्रॉनच्या प्रेमाची साथ मिळाली. 

हेही वाचा :  शिकवणीच्या नावाखाली मुलींच्या धर्मांतराचा गोरखधंदा , राहुरी तालुक्यातील धक्कादायक प्रकार

प्रेमासमोर सगळं जग हरलं!

या दोघांच्या प्रेमासमोर सगळं जग हरलं. त्यांनी लग्न केलं आणि आज ब्रिजट यांचं वय 70 असून मॅक्रॉन यांचं वय हे 45 वर्षांचं आहे. याचाच अर्थ त्या दोघांमध्ये 25 वर्षांचा फरक आहे. या दोघींनी  2007 मध्ये लग्न केलं. त्यावेली मॅक्रॉन यांनी तिन्ही सावत्र मुलांना वचन दिलं होतं की, आमच्या प्रेमाचा स्विकार केल्याबद्दल धन्यवाद. आमचं नातं सामान्य नाही पण आम्ही कायम तुमच्यासोबत असणार आहात. 
 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 …

जगातील 50 श्रीमंत शहरांच्या यादीत भारतातील दोन प्रमुख शहरं; Washington DC लाही टाकलं मागे

Worlds 50 Wealthiest Cities: जगातील सर्वात श्रीमंत 50 शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक …