दुबईमध्ये अडकली नवाजुद्दीन सिद्दीकीची मोलकरीण, व्हिडीओ व्हायरल

Nawazuddin Siddiqui: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीन आणि त्याची पत्नी आलिया सिद्धीकी यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरु आहेत. त्यातच आता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या दुबईमधील (Dubai) मोलकरणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नवाजुद्दीनची पत्नी आलिया सिद्दीकीचे वकील रिजवान सिद्दीकीनं शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नवाजुद्दीनची मोलकरीण सपना ही भावूक झालेली दिसत आहे. 

रिजवान सिद्दीकी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसते की, सपना म्हणते, ‘मी सपना बोलत आहे. मी नवाजुद्दीन सरांच्या घरी अडकले आहे. मॅडम ‘गेल्यावर सरांनी मला व्हिसा दिला होता. माझ्या पगारातून व्हिसाचे पैसे कापले जात आहेत. मला दोन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यामुळे मला खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. दीदी नुकतीच गेली, तिलाही खूप अडचणी येत होत्या. त्यांना भारतातही जाऊ दिले नाही. ती  कष्टाने भारतात पोहोचली आहे. सध्या मी इथे एकटी आहे. माझ्याकडे खायला अन्न नाही तसेच माझ्याकडे पैसे देखील नाहीत. मी तुम्हाला विनंती करतो की मला येथून बाहेर काढा आणि मला माझा पगार हवा आहे. मला माझ्या घरी भारतात जायचे आहे. मला जाण्यासाठी तिकीट आणि पगार हवा आहे. मी तुम्हाला ही विनंती करतो.’

नवाजुद्दीन सिद्दीकी  आणि त्याची पत्नी आलिया यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहेत. आलिया सिद्दीकीनं फैमिली कोर्टामध्ये याचिका दाखल करुन आपल्या मुलाच्या फॅटरनिटी टेस्टची मागणी केली आहे. तसेच ती लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल करणार आहे, असंही म्हटलं जात आहे. 

हेही वाचा :  Jacqueline Fernandez : बेल की जेल? जॅकलिन फर्नांडिसच्या जामिनाचा आदेश आज सुनावण्यात येणार

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या गँग ऑफ वासेपूर, मंटो या चित्रपटांना आणि सेक्रेड गेम्स या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नवाजुद्दीन हा लवकरच  ‘हड्डी’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

संबंधित बातम्या

Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकीने मुंबईमधील आलिशान घर सोडलं? सध्या राहतोय हॉटेलमध्ये; जाणून घ्या नेमकं कारणSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …