नवी मुंबईत सैराट! भावाने बहिणीच्या बॉयफ्रेंडला वाशी रेल्वे स्टेशनवर बोलावले आणि…

Navi Mumbai Crime News : मराठीतील प्रसिद्ध सैराट चित्रपटाप्रमाणे खरी खुरी घटना नवी मुंबईत घडली आहे.  भावाने बहिणीच्या बॉयफ्रेंडवर जीवघेणा हल्ला केला आहे. वाशी रेल्वे स्थानकात हा सर्व हल्ल्याचा थरार घडला आहे. भावाचे बहिणीच्या प्रेमसंबधाला विरोध होता. त्यातूनच त्याने बहिणीच्या प्रियकरावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

नवी मुंबईतील वाशी येथे दोन तरुणांकडून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आलेत. वाशी रेल्वे स्थानक परिसरात सोमवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. आरोपीच्या बहिणीसोबत तरुणाचे प्रेमसंबंध होते, याला विरोध असल्याने हा हल्ला करण्यात आला आहे.  हसन सिद्दीकी आणि युसूफ शहा अशी अटक आरोपींची नावे आहेत.  निजामूद्दीन खान असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

हसन सिद्दीकी आणि युसूफ शहा या दोघांनी निजामूद्दीन खान याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. यावेळी निजामुद्दीनला वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या रघुराम पै याच्यावर देखील हल्लेखोरांनी हल्ला केला. यात तो देखील गंभीर जखमी झाला आहे.  वाशी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत हल्लेखोरांना आपल्या सर्विस रीव्हॉल्वरचा धाक दाखवत अटक केली. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा :  मुंबईवर पाणीसंकट? धरणक्षेत्रात फक्त 23 टक्के पाणीसाठा

आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून दाम्पत्याला जिवंत जाळले

आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून दाम्पत्याला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार नगरच्या निघोजमध्ये घडला होता. यात रुख्मिणी रणसिंग यांचा मृत्यू झालाय. तर मंगेश रणसिंग हे गंभीररित्या भाजलेत. दोघांनीही घरच्यांच्या विरोधाला न जुमानता आंतरजातीय विवाह केला होता.

सख्या बहिणीची आणि तिच्या प्रियकराची हत्या करणाऱ्या भावाला फाशी

सख्या बहिणीची आणि तिच्या प्रियकराची हत्या करणाऱ्या भावाला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलीय. हत्येत सामील असलेल्या चुलत भावाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात हे सैराट स्टाईलचं दुहेरी हत्याकांड घडलं होतं.

मुलगी पळून गेल्यानं चिडलेल्या वडिलांनी आणि काकांनी मुलाचं कुटुंबच उध्वस्त केलं

त्या दोघांनी प्रेम केलं आणि लग्न करण्यासाठी ते घरातून पळून गेले. मात्र याची फार मोठी किंमत मुलाच्या घरच्यांना मोजावी लागली. मुलगी पळून गेल्यानं चिडलेल्या वडिलांनी आणि काकांनी मुलाचं कुटुंबच उध्वस्त केलं. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील ही धक्कादायक घटना.

हेही वाचा :  नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, 'या' भागांमध्ये 12 तास पाणीकपात

 Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

रामायणावर आधारित नाटकामुळे IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1 लाख 20 हजारांचा दंड; तक्रारीत काय म्हटलंय पाहा

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबईने रामायणाचे विडंबन मानले जाणारे ‘राहोवन’ हे वादग्रस्त नाटक सादर …

‘मराठी माणूस यांची चड्डीपण..’, ‘बिनशर्ट’वरुन मनसेचा ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, ‘हिरव्या..’

Uddhav Thackeray Vs Raj Thackeray: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त दिलेल्या …