नवाब मलिकांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी तर, विरोधात भाजपचे आंदोलन


ईडीच्या कार्यवाहीनंतर नाशिकमध्ये वातावरण तप्त

नाशिक :  राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे

शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी पक्ष कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. दुसरीकडे, मलिक यांच्या अटकेचे स्वागत करीत त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी भाजपकडूनही आंदोलन करण्यात आले.

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मलिक यांना गुन्हेगारी जगताशी संबंध आणि पैशांची पळवापळवी या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

ईडीने १५ फेब्रुवारी रोजी मुंबईत छापे टाकले होते. त्यामधून गुन्हेगारी जगताशी असलेला संबंध, कथित बेकायदेशीर खरेदी आणि मालमत्तांची विक्री, हवाला व्यवहार असे विविध आरोप त्यांच्यावर लावण्यात आले

आहेत. मलिक यांना देशद्रोही ठरविण्याचा केंद्र सरकारचा डाव हाणून पाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले. राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या वतीने मलिकांचे जोरदार समर्थन करण्यात आले.

यावेळी शादाब सय्यद, जय कोतवाल, बाळा निगळ, सागर बेदरकर, विशाल डोखे, राहुल कमानकर आदी उपस्थित होते.

दुसरीकडे, मलिक यांना करण्यात आलेल्या अटकेच्या समर्थनार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने पक्ष कार्यालयासमोर जोडे मारो आंदोलन करण्यात आले. मलिक यांच्याविरोधात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले असून विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी मलिकांच्या छायाचित्राला जोडे मारत आपला निषेध व्यक्त केला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा :  मराठीच्या अभिजात दर्जासाठीचा राजकीय स्टंट; संजय राऊतांच्या भाषेमुळे महाराष्ट्र होतोय बदनाम – विनोद तावडे

यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मलिक यांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, मलिक यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी देशद्रोही असलेल्या मलिक यांना पाठीशी का घालण्यात येत आहे, असा प्रश्न उपस्थित केला.

ठाकरे, काँग्रेस किंवा पवार त्यांना पािठबा देत असतील तर त्यांचाही या कटात सहभाग आहे का, अशी शंका उपस्थित करण्यात आली. या सर्व प्रश्नांची उत्तरे ठाकरे सरकारने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. आंदोलनास शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

The post नवाब मलिकांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी तर, विरोधात भाजपचे आंदोलन appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …