Nashik : माझा खंबीर पाठीराखा… सत्यजित तांबे यांच्या जवळच्या सहकाऱ्याचे निधन

Nashik : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या (nashik graduate constituency election) निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सत्यजित तांबे (satyajeet tambe) आणि शुंभागी पाटील (shubhangi patil) यांच्यात थेट लढत झालेल्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडेच अनेकांचे लक्ष होते. मात्र निवडणुकीच्या निकालाआधीच अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना मोठा धक्का बसला आहे. सत्यजित तांबे यांचे निकटवर्तीय आणि नाशिक काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष ( ग्रामीण ) मानस पगार (manas pagar) यांचे बुधवारी रात्री अपघाती निधन झाले आहे.

गुरुवारी नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल लागणार असल्याने मानस पगार आणि त्यांचे काही सहकारी नाशिक हुन पिंपळगाव बसवंत जात होते. मात्र रस्त्यातच त्यांच्या गाडीला गंभीर झाला. अपघातानंतर मानस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नाशिकमधील लोकमान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र मानस यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. इतरांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

माझा खंबीर पाठीराखा…

मानस पगार यांच्या निधनाची बातमी समजताच सत्यजित तांबे यांनी स्वतः ट्विट करत आपल्या जवळच्या सहकाऱ्याला श्रद्धांजली वाहिली आहे. फेसबुक, ट्विटरवर अनेकांनी मानस पगारच्या अपघाती निधनाबाबत दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. “माझा खंबीर पाठीराखा, सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे,” असे सत्यजित तांबे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

रावसाहेब दानवेंच्या घराबाहेरील आंदोलनानंतर चर्चेत

हेही वाचा :  क्षणभरही आनंद टिकला नाही; नविन कारची पूजा करुन घरी येताना विपरीत घडलं... एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

मानस पगार यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घराबाहेर केलेल्या आंदोलनाची संपूर्ण राज्यात चर्चा झाली होती. शेतकऱ्यांबद्दल वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दानंतर मानस पगार यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घराबाहेरच आंदोलन केलं होतं.  या प्रकरणात मानस पगार यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना अटकही झाली होती. त्यांच्या सुटकेसाठी युवक काँग्रेसने सोशल मीडियावर मोहीम सुरू करण्यात आली होती.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलं ‘जय श्री राम’, शिक्षकाने केलं पास.. विद्यापिठाकडून कारवाई

Trending News : उत्तर प्रदेशमधल्या जौनपूर इथल्या वीर बहाद्दूर सिंह पूर्वांचल युनिव्हर्सिटीतल्या उत्तर पत्रिका तपासणीतल्या …