‘नाम है जयेशभाई और काम है जोरदार’; रणवीरनं जाहीर केली ‘जयेशभाई जोरदार’ची रिलीज डेट

Jayeshbhai Jordaar : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंहचा (Ranveer Singh) चाहता वर्ग मोठा आहे. रणवीरच्या चित्रपटांना त्याच्या चाहत्यांची विशेष पसंती मिळते. त्याच्या आगामी चित्रपटांची वाट प्रेक्षक उत्सुकतेने पाहात असतात.  रणवीरचा जयेशभाई जोरदार (Jayeshbhai Jordaar) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकतीच रणवीरनं या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. रणवीरनं एक खास व्हिडीओ देखील शेअर केला आहे. 

रणवीरनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यानं बॉलिवूड चित्रपटांमधील ‘धनवाला हीरो, फन वाला हीरो, नाचणारा हीरो, गाणारा हीरो’ असे काही हीरोंचे प्रकार दाखवले. पण जयेशभाई हा हीरो या सर्व हीरोपेक्षा वेगळा आहे, असं रणवीरनं या व्हिडीओमध्ये सांगितलं. व्हिडीओमध्ये रणवीर म्हणतो की,’ हा चित्रपट 13 मे 2022 मध्ये रिलीज होणार आहे.’ या व्हिडीला रणवीरनं कॅप्शन दिलं, ‘नाम है जयेश और काम है जोरदार ‘


रणवीरचा काही दिवसांपूर्वी 83 हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. तसेच रोहित शेट्टीच्या सर्कस या चित्रपटामध्ये देखील रणवीर प्रमुख भूमिका साकारणार आहे. 

हेही वाचा :  Happy Birthday Yami Gautam : 'विकी डोनर'ने दिली यामी गौतमला ओळख

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …