ना सिंदूर, ना मंगळसूत्र तरी नववधू कियाराच्या सौंदर्याने भारावली गर्दी, सिद्धार्थसोबत फोटो व्हायरल

नुकतेच लग्न झालेली जोडी sidharth malhotra आणि Kiara Advani यांच्यावर सध्या सगळ्यांचे बारीक लक्ष आहे. कारण नुकतेच विवाहबंधनात अडकलेल्या या दोन क्युट कपलचा संसार कसा सुरू आहे हे जाणून घेण्याची सगळ्यांना उत्सुकता आहे. त्यांच्या लाईफमध्ये लग्नानंतर काय बदल झाला हे सुद्धा सर्वांना जाणून घ्यायचे आहे. त्यामुळेच त्यांच्या मागे सतत कॅमेरे असतात.

तर आता काहीच दिवसांपूर्वी पुन्हा एकदा सिद्धार्थ आणि कियाराला एकत्र एअरपोर्टवर स्पॉट केले गेले. यावेळी दोघांचा लुक हा अगदी स्पेशल व सिंपल होता. आणि नेहमीप्रमाणे दोघेजण एकमेकांसोबत खूप सुंदर दिसत होते. त्यांची जोडी देखील खूपच गोड राजा-राणीसारखी दिसत होती. दोघांचेही हे फोटोज सोशल मीडीयावर तुफान व्हायरल झाले आणि चाहत्यांनी सुद्धा त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. काही लोकांनी कियाराच्या गळ्यात मंगळसूत्र नाही, कुंकू नाही हे पाहून नव्या नवरीला ट्रोल केले तर काही जणांनी तिच्या या सालस सिंपल लुकचं कौतुक केलं. (फोटो सौजन्य :- योगेन शाह, Instagram – manishmalhotra05, kiaraaliaadvani)

कियारा दिसली गोड

कियारा दिसली गोड

सिद्धार्थ आणि कियाराच्या या व्हायरल झालेल्या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. ऑल व्हाइट लूकमध्ये कियारा खरंच खूपच क्यूट दिसत होती. तिच्यावरून नजर हटतच नव्हती. जरी तिने मंगळसूत्र घातले नसले आणि भांगात सिंदूर लावलेले नसले तरीही ती खूप जास्त गोड आणि सुंदर दिसत होती. कियाराने यावेळी त्याने व्हाईट टँक टॉपसह फ्लेर्ड मॅचिंग पॅंट परिधान केली होतीच, पण सोबत कुल गॉगल घातला होता, ज्यामध्ये तिचा संपूर्ण स्वॅग दिसत होता.

हेही वाचा :  अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने शेअर केला जुळ्या मुलांचा फोटो, बाळांच्या हटके नावांनी सगळ्यांच लक्ष वेधलं

(वाचा :- अंबानी घराण्यासाठी कपडे डिझाईन करणा-याने उर्फीसाठी बनवली आगळीवेगळी साडी, आता चित्रा वाघ काय देणार प्रतिक्रिया?)​

गोल्डन बॅग ठरली खास

गोल्डन बॅग ठरली खास

कियाराच्या साईड गोल्डन बॅगने विशेष लक्ष वेधून घेतले, जी तिच्या पूर्ण आउटफिटला मस्त मॅच होत होती. कियाराने पायात हाय हिल्स परिधान करून आपला लुक कमप्लिट केला होता. कियाराला स्वत:ला फॅशन आणि सेन्सचा जबरदस्त सेन्स असल्याने अगदी सिंपल लुक सुद्धा आकर्षक कसा बनवायचा हे तिला बरोबर माहित आहे. आता हा लुक पण किती सिंपल आहे पण तरी तो व्हायरल झाला.
(वाचा :- गौरी खानचा हा फोटो एडिटेड की ओरिजनल? जाळीदार नेट टॉप -प्लाजो, गॉगल अन् सफेद ब्लेजरमध्ये केले काळजाचे ठोके ठप्प)​

सिद्धार्थ दिसला हँडसम

सिद्धार्थ दिसला हँडसम

कियारा तर सुंदर दिसली पण आपला चॉकलेट बॉय सिद्धार्थ सुद्धा कमी पडला नाही. यावेळी सिद्धार्थने पांढरी पँट आणि फिकट जांभळा टी-शर्ट घातलेला दिसला, ज्यात पांढरे शूज आणि चष्मा मॅचिंग होता. यामुळे सिद्धार्थला मस्त स्मार्ट लुक मिळतो होता. एकंदर दोन्ही न्यू कपल्स स्टाईल आणि फॅशनच्या बाबतीत कुठेच कमी नाहीत हे पुन्हा दिसून आले आणि पुन्हा एकदा जबरदस्त ट्युनिंग करत त्यांनी चाहत्यांची मने जिंकली.
(वाचा :- अखेर करीना व सैफचा मुलगा जेह अलीचे क्युट व लोभस फोटो आले समोर, लेदर जॅकेटमधला नखरा बघून तुम्हीही पोट धरून हसाल)​

हेही वाचा :  सुपरस्टार विकीचं कौतुक करण्यासाठी सिंपल कपड्यात आई बाबांची हजेरी, नेटकऱ्यांना साधेपणा भावला

नव्या कपल्सचा साज

नव्या कपल्सचा साज

नुकतेच लग्न झालेले असल्याने यावेळी सिद्धार्थ आणि कियाराच्या चेहऱ्यावर एक मस्त ग्लो दिसून येत आहे. लग्न झाल्यापासून वेगवेगळ्या लुकमधील त्यांचे फोटो सतत व्हायरल होत आहेत. यात कियारा कधी छान छान ड्रेस तर कधी वेस्टर्न मॉर्डन आऊटफिट्स घालून चाहत्यांना भुरळ पाडत आहे. लग्नानंतरचा ग्लो तसा तर सर्वच जोडप्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो. पण सिद्धार्थ आणि कियाराच्या चेहऱ्यावर तो अधिक जास्त खुलून दिसतोय. या फोटोत एकीकडे कियाराने सुंदरसा पिवळ्या धम्मक रंगाचा अनारकली ड्रेेस परिधान केला आहे तर पांढ-या कुर्त्यामध्ये सिद्धार्थने तिच्याशी ट्युनिंग केलं आहे. दुस-या फोटोत “इश्क का रंग लाल..” दोघेही लाल रंगाच्या कपड्यांत दिसून येत आहेत. या दोन्ही लुकमध्ये कियाराने अजिबात अतिरिक्त ज्वेलरी परिधान केली नाही तरीही ती मनमोहक दिसत आहे ती चेह-यावरील ग्लोमुळेच. यामुळे दोघांना वेगळा मेकअप करण्याची गरज देखील भासली नाही. नो मेकअप लुकमध्येही दोघे अगदी सुंदर आणि गोड दिसत आहेत.

(वाचा :- वहिनी Anissa Malhotra च्या डोहाळे जेवणाला अगदी नवाबी थाटात पोहचली Kareena Kapoor, पण होणा-या आईसमोर दिसली फिकी)​

हेही वाचा :  सखी गोखलेच्या ग्लॅम लुकने इंटरनेटवर लागली आग, बदललेला अवतार

ग्रँड रिसेप्शन लुकची चर्चा आजही सुरू

ग्रँड रिसेप्शन लुकची चर्चा आजही सुरू

कियारा अडवाणीने रिसेप्शनसाठी मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला अनोखा फिशटेल गाऊन परिधान केला होता. तिच्या या आऊटफिटमध्ये लांबलचक ब्लॅक व्हेलवेट स्कर्टसोबतच क्रीम-टोन्ड सिल्क टॉप होता. लुक अधिक लक्षवेधक बनवण्यासाठी तिने स्टेटमेंट एमराल्ड अर्थात पाचूचे आणि डायमंडचे दागिने परिधान केले होते. याचवेळी एकदम हलकासा मेकअप, हायलाइटेड चिक्स, काजळाने भरलेले डोळे आणि बनमध्ये बांधलेले केस कियाराचा लुक कम्प्लिट करत होते. दुसरीकडे, सिद्धार्थ एका शिमर ब्लॅक कलरच्या टक्सिडोमध्ये कमालीचा हॅंडसम दिसत होता.

(वाचा :- Ex बॉयफ्रेंड Sidharth Malhotra च्या रिसेप्शनला डायमंड साडीत आलियाची रॉयल एंट्री, अदांपुढे नवरी Kiara पडली फिकी)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ठाणे पालिकेतील सफाई कर्मचारी महिलेचा मुलगा बनला अधिकारी, UPSC साठी ‘अशी’ केली तयारी

UPSC Success Story: आपल्या मुलाने चांगल शिक्षण घेऊन मोठा अधिकारी व्हावं असं प्रत्येक आईला वाटत …

चंद्र एकाच जागी स्थिरावणार; तब्बल इतक्या वर्षांनी आकाशात दिसणार भारावणारं दृश्य

Lunar Standstill : चंद्र… इथं पृथ्वीवर प्रेमाच्या आणाभाकांपासून खगोलीय घटनांपर्यंत महत्वाच्या भूमिकांमध्ये आणि रुपांमध्ये हा …