मुसळधार पावसात कमी तेलकट, हॉटेलस्टाइल कुरकुरीत भजी बनवायचीय? मग फॉलो करा ‘या’ टिप्स

Cooking Tips in Marathi : बाहेर मस्त पाऊस सुरु आहे, मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी असल्याने मुलं घरी आहेत. त्यामुळे अशावेळी गरमा गरम भजी आणि मस्त चहा हा बेत तर होणारच…विकेंडचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी गरमागरम, कुरकुरीत, खमंग आणि कमी तेलकट भजी कशी बनावयची ते आज आम्ही सांगणार आहोत. (cooking tips hotel style crispy onion bhaji and Oil Free Bhaji Receipe video )

आजकाल प्रत्येक जण आपल्या आरोग्यासाठी जागृत आहेत. त्यामुळे तेलकट पदार्थ खाण्यास ते टाळाटाळ करतात. पण वरुण राजाचा कोसळत असताना प्रत्येकाला भज्यांची आठवण तर होणाराच ना…पण कमी तेलकट अगदी हॉटेलस्टाइल भुजी कशी करायची याबद्दल खालील टिप्स तुम्ही वापरल्यास घरातील मंडळी तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. 

क्रिस्पी कांदा भज्यांसाठी साहित्य 

बारीक – लांब चिरलेला कांदा

हिरवी मिरची

काश्मिरी लाल तिखट

जिरं पावडर

धणे पूड

आमचूर पावडर

ओवा

बेसन

तांदळाचं पीठ

मीठ

तेल

पाणी

अशी बनवा भज्जी

एका बाऊलमध्ये कांद्याचे बारीक लांब काप घ्या. आता यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, काश्मिरी लाल तिखट, जिरं पावडर, धणे पूड, आमचूर पावडर आणि ओवा घाला. आता त्यात 1 कप बेसन, अर्धा कप तांदळाचं पीठ आणि चवीनुसार मीठ घालून संपूर्ण मिश्रण मिक्स करा. कांद्याला पाणी सुटत असल्याने पाणी घालू नका. गरज पडल्यास फक्त पाणी शिंपडा.आता ही भजी तळून घ्या. 

हेही वाचा :  डोंबिवली स्थानकात जोडप्याचा किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल; नेटिझन्सने व्यक्त केली नाराजी | couple spotted kissing at dombivli and csmt platform commuters approach police

हे लक्षात ठेवा

भजी तळण्यासाठी जाड तळाचं भांडं वापरा. त्यामुळे तेलाचे तापमान स्थिर राहतं आणि भजी जास्त तेल शोषून घेत नाही. जर तेल नीट गरम झालं नाही तर भजी जास्त तेल शोषून घेतं.

त्याशिवाय तुम्ही ऑईल फ्री कांदा भजीचीदेखील बनवू शकता. त्याठी भजी बेक किंवा एअर फ्राय करा. 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान दारुच्या नशेत मला…,’ काँग्रेसच्या महिला नेत्याचे गौप्यस्फोट, ‘दार बंद करुन…’

छत्तीसगडमधील काँग्रेस नेत्या राधिका खेरा (Radhika Khera) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. प्रदेश कार्यालयाकडून वारंवार …