Movies releasing in March : मार्चमध्ये प्रदर्शित होणार ‘हे’ बिग बजेट सिनेमे

Movies releasing in March : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनेक निर्माते त्यांच्या सिनेमांच्या रिलीज डेट जाहीर करत आहेत. नुकताच आलिया भट्टचा (Alia Bhatt) ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मार्चमध्येदेखील अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘बच्चन पांडे’पासून (Bachchan Pandey) प्रभासच्या (Prabhas) ‘राधे श्याम’पर्यंत (Radhe Shyam) अनेक सिनेमे मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहेत. 

झुंड (Jhund) : अमिताभ बच्चनचा आगामी ‘झुंड’ सिनेमा 4 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 

तुलसीदास ज्युनियर (Toolsidas Junior) : तुलसीदास ज्युनियर सिनेमादेखील 4 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा एक क्रिडाविषयक सिनेमा असून संजय दत्त या सिनेमात स्नूकर परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

राधे श्याम (Radhe Shyam) : प्रभास आणि पूजा हेगडेच्या ‘राधे श्याम’ सिनेमाची प्रेक्षक गेले अनेक दिवस प्रतीक्षा करत आहेत. हा सिनेमा 11 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. 

द काश्मीर फाइल्स (The Kashmir Files) : मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर आणि पल्लवी जोशीचा द काश्मीर फाइल्स हा सिनेमा 11 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

हेही वाचा :  करिश्मानं का केला होता पूर्वाश्रमीच्या पतीवर केलेला कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप?

बच्चन पांडे (Bachchan Pandey) : बच्चन पांडे सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा 18 मार्चला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार आणि कृती सेनन मुख्य भूमिकेत आहेत. 

आरआरआर (RRR) : एसएस राजामौलींचा आरआरआर सिनेमा 25 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आलिया भट्ट आणि अजय देवगन या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. 

संबंधित बातम्या

Trending : ‘कच्चा बदाम’, ‘बचपन का प्यार’पासून ‘ढिंच्याक पूजा’पर्यंत ‘हे’ कलाकार रातोरात झाले स्टार

Pawankhind : जय शिवराय! दुसऱ्या आठवड्यातही ‘पावनखिंड’ सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कोट्यवधींची कमाई

JALSA First Look Poster : ओटीटीवर होणार मनोरंजनाचा धमाका, विद्या बालनचा ‘जलसा’ लूक प्रेक्षकांच्या भेटीला!

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …