यंदाही दम दाखवणार का?, सर्वात यशस्वी आयपीएल संघ मुंबई यंदा कशी खेळणार? काय असेल रणनीती?

Mumbai Indians : आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हटलं की मुंबई इंडियन्स (Mumbai Indians). तब्बल 5 वेळा जेतेपाद पटकावणाऱ्या मुंबई संघात यंदा महालिलावामुळे बरेच बदल झाले आहेत. त्यांचा हुकूमी एक्का हार्दीक पंड्या संघात नसून कृणाल, राहुल यांच्यासह परदेशी पाहुणे ट्रेन्ट बोल्ट, डी कॉक यांनाही पुन्हा संघात घेतलेलं नाही. त्यामुळे संघाचा चेहरामोहरा बऱ्यापैकी बदलला आहे. अशा संघाला घेऊन यंदा मैदानात उतरणारी मुंबई इंडियन्स नेमकी प्लेयिंग 11 कशी ठेवेल, काय रणनीती आखेल? साऱ्याकडे चाहत्यांचे लक्ष आहे.

मुंबईने लिलावापूर्वी कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार कायरन पोलार्ड यांना रिटेन केलं होतं. त्यानंतर ईशान किशनला तब्बल 15.25 कोटी देत संघात घेतलं. याशिवाय जोफ्रा, टीम डेव्हिड, डेवाल्ड अशा काही खेळाडूंवर कोट्यवधी खर्च केले आहेत. दरम्यान यंदाच्या आयपीएलपूर्वी मुंबई संघात कोणते प्लस पॉईंट आहेत आणि कोणते मायनस पॉईंट हे जाणून घेऊ…

पाया पक्का असल्याने संघाला फायदा

यंदा महालिलाव पार पडला असला तरी संघाने त्याआधी रिटेन दरम्यान आपले महत्त्वाचे 4 खेळाडू कोट्यवधी खर्चून रिटेन केले होते. त्यानंतर लिलावातही ईशानवर मोठा खर्च केला. त्यामुळे कर्णधार रोहितसह स्टार फलंदाज सूर्यकुमार, स्टार गोलंदाज बुमराह आणि स्टार अष्टपैली पोलार्ड हा संघाचा पाया असून हे सर्व यंदाही संघात असल्याने संघाला मोठा फायदा होईल हे नक्की. याशिवाय सर्व सामने मुंबई, पुण्यात होणार असल्याने हा एक मोठा फायदा मुंबई संघाला होईल.

हेही वाचा :  बांग्लादेशविरुद्ध मालिकाविजयानंतरही केएल राहुल ट्रोल, सोशल मीडियावर शेअर झाले मजेशीर मीम्स

मधल्या फळीचा धोका

मुंबईच्या मधल्या फळीचा विचार करता पोलार्ड सोडल्यास त्याच्यासोबत सामना फिनिश करण्यासाठी आणखी कोण? हा प्रश्न आहे. कारण मुंबईचे बेस्ट फिनिशर पंड्या ब्रदर्स अर्थात कृणाल, हार्दीक संघात नसल्याने संघासमोर मधल्या फळीत कोण फलंदाजी करणार हा प्रश्न मोठा आहे.   

मुंबई इंडियन्स संपूर्ण संघ

रोहित शर्मा (16 कोटी), जसप्रीत बुमराह (12 कोटी), सूर्यकुमार यादव (8 कोटी), कायरन पोलार्ड (6 कोटी), ईशान किशन (15.25 कोटी), डेवाल्ड ब्रेविस (3 कोटी), बसिल थम्पी (30 लाख), मुरुगन आश्विन (1.6 कोटी), जयदेव उनाडकट (1.30 कोटी), मयांक मार्कंडे (65 लाख), तिलक वर्मा (1.70 कोटी), संजय यादव (50 लाख), जोफ्रा आर्चर (8 कोटी), डॅनियल सॅम्स (2.60 कोटी), फॅबियन अॅलन (75 लाख), टिमल मिल्स (1.5 कोटी), टीम डेव्हिड (8.25 कोटी), रिले मरेडिथ (1 कोटी), मोहम्मद अर्शद खान (20 लाख), अर्जून तेंडुलकर (30 लाख), रमनदीप सिंह (20 लाख), राहुल बुद्धी (20 लाख), ऋतिक शौकीन (20 लाख), आर्यन ज्युयल (20 लाख), अनोलप्रीत सिंह (20 लाख). 

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

हेही वाचा :  KKR vs PBKS, Head to Head : कोलकाता विरुद्ध पंजाब आमने-सामने, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …