सामना जिंकून दिला अन् इतिहासही रचला; मेहंदी हसन आणि मुस्तफिजुरच्या नावावर खास विक्रमाची नोंद

IND vs BAN 1st ODI: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात रविवारी पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला. या थरारक सामन्यात भारताला एका विकेटनं पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारतीय संघ तीन सामन्यांच्या एक दिवसीय मालिकेत 1-0 नं पिछाडीवर गेलाय. मेहंदी हसन (Mehndi Hasan) आणि मुस्तफिजून रहमाननं (Mustafizur Rehman) भारताच्या तोंडातून विजयी घास हिसकावून बांगलादेशला विजय मिळवून दिला. तसेच दहाव्या विकेटसाठी नाबाद 51 धावांची भागिदारी करत खास विक्रमाला गवसणी घातली.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना ढाकाच्या श्री बांगला नॅशनल स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात मेहंदी हसन आणि मुस्तफिजूर रहमाननं दहाव्या विकेट्ससाठी 51 धावांची विजयी भागिदारी केली. बांगलादेशकडून भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये दहाव्या विकेटसाठी ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. यापूर्वी 2003 मध्ये बांगलादेशनं भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यात दहाव्या विकेटसाठी 25 धावांची भागीदारी केली होती.

ट्वीट-

मेहंदी हसन आणि मुस्तफिजूर रहमानची महत्वपूर्ण भागीदारी
भारताला 187 धावांवर रोखल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या बांगलादेशच्या संघाचीही दमछाक झाली. बांगलादेशनं 136 धावांवर नऊ विकेट्स गमावल्या.मात्र, मेहंदी हसननं संघाचा डाव सावरत संघाला विजयापर्यंत पोहचवलं.हसन महमूद बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या मुस्तफिजुर रहमाननं मेहंदी हसनला चांगली साथ दिली. त्यानं 11 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीनं 10 धावा केल्या. तर, मेहंदीनं नाबाद 38 धावांची खेळी केली. मेहदी हसन आणि मुस्तफिझूर यांनी 10व्या विकेटसाठी 51 धावांची विजयी भागीदारी केली. दोघांनीही भारतीय गोलंदाजांना एकही संधी दिली नाही आणि बांगलादेशला एक विकेटनं विजय मिळवून दिला.

हेही वाचा :  ISL Final : आयएसएलला आज मिळणार नवा चॅम्पियन, फायनलमध्ये हैदराबाद एफसी विरुद्ध केरळा ब्लास्टर्स

हे देखील वाचा-



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …