Medical Education: यूजीच्या जागा ७५ टक्के तर पीजी कोर्समध्ये ९३ टक्के वाढ

Medical Education: गेल्या सात वर्षांत देशातील वैद्यकीय शिक्षण (Medical Education) क्षेत्रात अनेक महत्वाचे बदल घडून आले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार २०१४ पासून देशात यूजी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या (UG Medical Course) जागांची संख्या साधारण ७५ टक्क्यांनी वाढली आहे. तर पीजी अभ्यासक्रमांच्या (PG Courses) जागांची संख्या ९३ टक्क्यांनी वाढली आहे.

मंगळवारी केंद्र सरकारच्या (Central Government) लेखी प्रश्नाच्या उत्तरात राज्यसभेत यासंदर्भात माहिती देण्यात आली. २०१४ पूर्वी पदवीपूर्व वैद्यकीय जागांची संख्या ५१,३४८ होती. जी आता ८९,८७५ झाली आहे. त्याच कालावधीत यूजीच्या जागांची संख्या ७५ टक्के आणि पदव्युत्तर जागांची संख्या ९३ टक्क्यांनी वाढली आहे. २०१४ पूर्वी पदव्युत्तर जागांची संख्या ३१,१८५ होती. ती आता ६०,२०२ झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे भारतीय विद्यार्थी एमबीबीएस करण्यासाठी परदेशात जातात आणि परदेशी वैद्यकीय पात्रता मिळवतात, त्यांना भारतात डॉक्टर म्हणून नोंदणी करण्यासाठी परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा (foreign medical degree exam, FMGE) उत्तीर्ण करावी लागते.

Mumbai Metro मध्ये विविध पदांची भरती, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
१५७ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता

देशात डॉक्टरांची पदे वाढवण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. जागांची संख्या वाढवण्यासाठी जिल्हा/रेफरल रुग्णालये श्रेणीसुधारित करून नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यासाठी पावले उचलण्यात आली असल्याची माहिती मांडविया यांनी दिली.

हेही वाचा :  IITच्या ३२ विद्यार्थ्यांचे 'कोटी' उड्डाण, पहिल्याच प्लेसमेंटमध्ये घसघशीत वार्षिक पॅकेज

नोकरीच्या शोधात असाल तर ‘या’ ६ टिप्स नक्की फॉलो करा
केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत १५७ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली असून ७१ आधीच कार्यरत आहेत. यामध्ये एमबीबीएस (MBBS) आणि पीजी जागा (PG Course) वाढवण्यासाठी, विद्यमान राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या (Medical College) प्रगतीसाठी केंद्रीय योजना आणि सुपर स्पेशालिटी ब्लॉक्सची निर्मिती करण्यात येत आहे. तसेच सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रगतीसाठी केंद्रीय क्षेत्र योजना आणण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.

कर्मचाऱ्यांना हवंय Work From Home, वेतनवाढ-नोकरी सोडण्यासही तयार
७५ परियोजना मंजूर, ५५ केल्या पूर्ण
एकूण ७५ प्रोजेक्ट्सना मंजुरी देण्यात आली असून ५५ पूर्ण झाले आहेत. केंद्र सरकारच्या योजनांतर्गत नव्या एम्सच्या स्थापनेअंतर्गत २२ एम्सना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी १९ मध्ये पदवीपूर्व अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. तसेच, देशातील संबंधित वैद्यकीय जागांच्या संख्येत झपाट्याने वाढ होण्यासाठी सरकारने नॅशनल कमिशन फॉर अलाइड अँड हेल्थ केअर प्रोफेशन्स (NCAHP) कायदा २०२१ लागू केला आहे.

RailTel Recruitment: रेलटेल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांची भरती

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …