डोंबिवलीत एमआयडीसी परिसरात भीषण स्फोट; 6 जणांचा मृत्यू, 48 जण जखमी

Dombivali Midc Blast Latest Newsडोंबिवलीमधील एमआयडीसी परिसरात स्फोट झाला आहे. यामुळे भीषण आग लागली आहे. या आगीत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 40 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. एमआयडी फेज 2 मध्ये असलेल्या अंबर केमिकल कंपनीत आग लागली. या आगीमुळे अनेक इमारती, दुकानांच्या काचा फुटल्या आहेत. सध्या अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. ही आग पसरत असल्याने सुरक्षेच्या कारणात्सव आजूबाजूचा परिसर रिकामी करण्यात आला आहे. अमुदान केमिकल कंपनी, मेहता पेंट, के.जी.एन, केमिकल, सप्त वर्ण, हुंडाई शो रूम  इत्यादी कंपनीमध्ये भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती प्राप्त समोर आली आहे.

कंपनीच्या बॉयलरचा स्फोट

प्राथमिक माहितीनुसार, डोंबिवली परिसरातील एमआयडी फेज 2 मध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर अनेक इमारतींना हादरेही बसले आहेत. अनेक इमारतींच्या काचाही फुटल्या आहेत. एमआयडी फेज 2 मध्ये असलेल्या एका कंपनीच्या बॉयलरचा स्फोट झाला आहे. अमुदान केमिकल कंपनी,मेहता पेंट,के.जी.एन, केमिकल,सप्त वर्ण ,हुंडाई शो रूम आग लागल्याची माहिती समोर येत आहे. सध्या अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. या स्फोटाची तीव्रता किती आहे, हा स्फोट नेमका कुठे झाला, त्याची कारण काय आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. यात 40 जण जखमी आणि दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती अद्याप समोर आली आहे

हेही वाचा :  TMC Job: ठाणे पालिकेत बंपर भरती, निवड झाल्यास 75 हजारपर्यंत मिळेल पगार

बचावकार्य सुरु

डोंबिवली परिसरात झालेल्या या भीषण स्फोटामुळे एमआयडीसी परिसराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारण 24 मे 2016 मध्ये डोंबिवली एमआयडीसी परिसरात भीषण स्फोट झाला होता. यावेळी 12 जणांचा मृत्यू झाला होता. तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. ज्या कंपनीत हा स्फोट झाला होता, त्यात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे मृतदेहदेखील सापडले नव्हते. त्यावेळी काही किलोमीटर परिसरात स्फोटामुळे हादरे जाणवले होते. या स्फोटाचा आवाजही दूरपर्यंत गेला होता. यावेळी अनेक इमारतींच्या काचा फुटल्या होता. अनेक इमारतींना तडे गेले होते. सध्या अग्निशमन दलाच्या ४ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच पोलीस यंत्रणा, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या या घटनेचे बचावकार्य वेगाने सुरु आहे.  

देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

“डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दु:खद आहे. 8 जण या घटनेत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकार्‍यांशी माझी चर्चा झाली असून, तेही 10 मिनिटांत घटनास्थळी पोहोचत आहेत. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्नीशमन दलाच्या चमू पाचारण करण्यात आल्या आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो”, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 

प्रत्यक्षदर्शीची प्रतिक्रिया

“माझे ऑफिस या ठिकाणी बाजूला आहे. यावेळी मोठा आवाज आला म्हणून आम्ही बाहेर येऊन पाहिलं, त्यावेळी तिथे खूप मोठा स्फोट झाल्याचे समजलं. आता आजूबाजूच्या कंपनीत ही आग पसरत चालली आहे. आता या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आहेत”, अशी माहिती स्वप्नील कोरपे या प्रत्यक्षदर्शीने दिली. 

हेही वाचा :  नूह हिंसाचार प्रकरणात काँग्रेस आमदाराला अटक; पोलिसांना सापडले महत्त्वाचे पुरावे

वैशाली दरेकर यांची प्रतिक्रिया

“डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात यापूर्वीही अशाच भीषण स्फोट झाला होता. यात घराच्या काचाही फुटल्या होत्या. हा स्फोटही तसाच आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कंपन्यांकडून योग्य ती काळजी घेतली जात नसावी, त्यामुळे हे स्फोट होत असावेत. हा सर्व प्रकार भयावह आहे. यावर योग्य ती काळजी घेतली जात नाही. कंपन्यांसह सर्वांनी ही काळजी घ्यायला हवी. ही आग कोणत्या प्रकारची आहे, यंत्रणा आग विझवण्यासाठी सक्षम आहे की नाही, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.”, अशी माहिती ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली दरेकर यांनी दिली. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्ती

Sangali News : कन्नड आणि उर्दु शाळांमध्ये चक्क मराठी माध्यमिक शिक्षकांचे नियुक्ती करण्याचा अजब कारभार …

OTP कशासाठी वापरला? रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट होता का? निवडणूक अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा

Ravindra Waikar :  मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातली निवडणूक वादाच्या भोव-यात सापडली आहे. शिवसेनेचे विजयी …