ब्लॅक अँड व्हाईट ड्रेसमध्ये मल्होत्रांच्या सुनेचा रॉयल अंदाज,कियाराच्या पाचूच्या दागिन्यांनी वेधले सर्वांचे लक्ष

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी ७ फेब्रुवारीला राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये रॉयल पद्धतीने लग्न केले. अगदी जवळचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. लग्नानंतर दोघांनी दिल्लीतील सिद्धार्थच्या घरी ‘गृह प्रवेश’ केला. यावेळी कियाराने लाल रंगाच्या ड्रेस परिधान केला होता. सिद्धार्थ आणि कियारा आज म्हणजेच १२ फेब्रुवारीला मुंबईत ग्रँड रिसेप्शन सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्यामध्ये कियाराने ब्लॅक अँड व्हाईट रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. व्हेलवेटच्या या ड्रेसमध्ये कियारा खूप सुंदर दिसत आहे. यावेळी सिद्धार्थ मल्होत्रान देखील ब्लॅक रंगाच्या सुटमध्ये पाहायला मिळाला. मुंबईतील सेंट रेजिस येथे लग्नाचे रिसेप्शन आयोजित केले आहे. या रॉयल रिसेप्शनसाठी पांढर्‍या फुलांची सजावट देखील करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य :- योगेन शाह)

कियाराचा ग्लॅमरस लुक

कियाराचा ग्लॅमरस लुक

लग्नाच्या दिवशी कियाराने पेस्टल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. त्यानंतर कियाराने लाल रंगाचा सुंदर सलवार सूटमध्ये गृहप्रवेश केला. आता रिसेप्शनसाठी कियाराने ब्लॅक अँड व्हाईट रंगाचा सुंदर बॉडीकॉन गाऊन परिधान केला होता. कियाराच्या या ड्रेसला व्हेलवेटच्या कापडाचा वापर करण्यात आला होता. तर टॉपसाठी ग्लॉसी व्हाईट रंगाच्या कापडाचा वापर करण्यात आला होता.

हेही वाचा :  सिद्धार्थ-कियाराच्या संगीत सोहळ्यातील फोटो पाहिलेत का?

(वाचा :- Bigg Boss फेम निक्की तंबोळीचा डीपनेक ब्लाऊजमध्ये जलवा, त्या एका गोष्टीने वेधून घेतले चाहत्यांचे लक्ष) ​

टॉपच्या डिझाईनने वेधले सर्वांचे लक्ष

टॉपच्या डिझाईनने वेधले सर्वांचे लक्ष

रिसेप्शनसाठी कियाराने परिधान केलेल्या या टॉपला चौकोनी डीपनेक देण्यात आला होता. तर व्हेलवेटच्या या टॉपला लँग स्लिव्ज देण्यात आले होते. या संपूर्ण लुकमध्ये कियारा खूपच सुंदर दिसत होती. यावेळी कियाराच्या चेहऱ्यावर नववधूचा नूर स्पष्टपणे दिसत होता. सिद्धार्थबद्दलचे प्रेम तिच्या चेहऱ्यावर दिसत होते.

(वाचा :- Kiara Advani Siddharth गोल्डन पर्स,पिंक शाल घेऊन नवराईची लगीनघाई, कियाराच्या चेहऱ्यावर लग्नाचा ग्लो लपवता लपला नाही)

प्रेमाचा जल्लोष…

कियाराचे दागिने

कियाराचे दागिने

​कियाराने या लुकसाठी हिरव्यारंगाचे पाचूचे दागिने परिधान केले होते. ब्लॅक अँड व्हाईट ड्रेसवर ग्रीन असे कॉम्बिनेशन खूपच सुंदर दिसत होते. तुम्हीदेखील अशी रंगसंगती ट्राय करू शकता.

सिद्धार्थचा लुक

सिद्धार्थचा लुक

रिसेप्शनसाठी सिद्धार्थनेसुद्धा शिमरी पॅर्टनचा कोट परिधान केला आहे. या लुकमध्ये सिद्धार्थ डॉपरच दिसत आहे. या दोघांवरुन कोणाचीच नजर हटत नाहीये.

रिसेप्शनमध्ये कलाकारांची हजेरी

रिसेप्शनमध्ये कलाकारांची हजेरी

सिद्धार्थ आणि कियाराच्या रिसेप्शनला अनेक कलाकारांनी हजेरी लावली, सर्वप्रथम अभिषेक बच्चनची झलक पाहायला मिळाली. त्यानंतर कियाराची बहीण पतीसोबत आली. कियारा आणि सिडच्या रिसेप्शनमध्ये अजय देवगण आणि काजोल देखील पाहायला मिळले. सिद्धार्थ आणि कियाराच्या रिसेप्शनमध्ये सिद्धार्थची एक्स आलिया भट्टही पोहचली होती.

हेही वाचा :  Maharastra Politics: शिवसेना-भाजप युती कोणामुळे तुटली? आत्मचरित्रात शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट!Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : तीन तिघाडा, काम बिघाडा..! अजितदादांमुळे महायुतीला फटका? पाहा स्पेशल रिपोर्ट

Special Report On Mahayuti Politics : लोकसभेच्या निकालात महायुतीचा राज्यात धुव्वा उडाला. आता महायुतीत यावरुन …

पुण्याच्या रस्त्यावर बाईकस्वाराला चिरडणारी मर्सिडीज बेंज कोणाच्या मालकीची? माहिती आली समोर

Pune Accident: पुण्याच्या रस्त्यांवर धावणाऱ्या महागड्या गाड्यांखाली चिरडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. त्यामुळे पुण्याच्या रस्त्यांवर …