‘मला तू खूप आवडतोस’, पण… : तेजस्विनी पंडित

Tejaswini Pandit : मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिचा आगामी ‘बांबू’ (Bamboo) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा टीझर शेअर करत तेजस्विनीने एक हटके कॅप्शन लिहिलं आहे. तिच्या कॅप्शनने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. 

तेजस्विनीने लिहिलं आहे,”मुलींचं फेवरेट वाक्य…. तुमच्याबरोबर असं झालंय का? मला तू खूप आवडतोस पण… आणि मग लागतात ‘बांबू”. तेजस्विनीने चाहत्यांना प्रश्नदेखील विचारला आहे,’बांबू’चा टीझर पाहिलात का?”. तेजस्विनीची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. 


News Reels

तेजस्विनी पंडितच्या ‘बांबू’ या सिनेमाचा टीझर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. विशाल देवरूखकरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात अभिनय बेर्डे, शिवाजी साटम, अतुल काळे, वैष्णवी कल्याणकर, पार्थ भालेराव, स्नेहल शिदम, समीर चौघुले मुख्य भूमिकेत आहेत. तर तेजस्विनी पंडित या सिनेमाची निर्माती आहे. 

तेजस्विनीचा ‘बांबू’ कधी होणार प्रदर्शित?

‘बांबू’ हा सिनेमा 26 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिनयचा एक वेगळा लूक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याचा हा नवा अंदाजदेखील प्रेक्षकांना नक्की आवडेल. हा सिनेमा तरुणाईला भुरळ घालणारा आहे. या सिनेमाची कथा प्रेक्षकांना आपली वाटेल. प्रेमाची आठवण करुन देणारा ‘बांबू’  हा सिनेमा आहे. 

हेही वाचा :  Bhirkit : गिरीश कुलकर्णींच्या 'भिरकीट' सिनेमाचे पोस्टर आऊट, 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित

संबंधित बातम्या

Tejaswini Pandit : ‘हे’ लोक समोर आले की…; तेजस्विनी पंडितचा गौप्यस्फोट



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …