महाशिवरात्रीच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे भिडे मास्तर ट्रोल, उत्तर देताना म्हणाले “आम्हा कलाकारांसाठी प्रेक्षक हेच…”


छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. गेल्या १३ वर्षांपासून ही मालिका आपले मनोरंजन करत आहे. या मालिकेत भिडे मास्तरची भूमिका साकारणारा अभिनेता मंदार चांदवडकर हे नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतात. पण नुकतंच मंदार चांदवडकर यांना एका पोस्टमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. मात्र मंदार यांनी नुकतंच त्या ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर दिले आहे.

मंदार चांदवडकर यांनी १ मार्चला महाशिवरात्रीनिमित्त इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओद्वारे त्यांनी सर्व चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या व्हिडीओत आत्माराम भिडे हे शिव महामृत्यूंजय मंत्राचे पठण करताना दिसत आहे. त्यासोबत त्यांनी कपाळावर चंदनाचा टिळाही लावलेला दिसत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना त्यांनी ‘ओम नमः शिवाय’ असे म्हटले आहे. त्यांच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसरीकडे मात्र एका युजरने त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यांच्या या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने म्हटले की, “भिडे भाऊ… कॅमेऱ्यासमोर नाही तर देवासमोर बोला”. यावर आत्माराम भिडे यांनी त्याला अत्यंत नम्रपणे उत्तर दिले. या ट्रोलरला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, “तू अगदी बरोबर बोलत आहेस. मी देवासमोरच बोललो. तसेही आम्हा कलाकारांसाठी प्रेक्षक हे कोणत्याही देवापेक्षा कमी नाहीत.”

ट्रोलला दिलेले हे उत्तर पाहून सोशल मीडियावरील अनेकांवर छाप पाडली आहे. विशेष म्हणजे ट्रोल करणाऱ्याने त्याच्या चुकीबद्दल अभिनेत्याची माफीही मागितली. आत्माराम भिडेंनी प्रत्युत्तर दिल्यानंतर तो नेटकरी म्हणाला, ‘सर, तुम्ही माझे मन जिंकले आहे. मी टीव्हीवर तारक मेहता पाहत होतो आणि त्याचवेळी इन्स्टाग्रामही चेक करत होतो. त्यावेळी तुमची पोस्ट पाहिली आणि त्यावर विनोद करण्याच्या मनःस्थितीत ती कमेंट केली होती. पण तुमचे हे उत्तर ऐकून माझा दिवस मस्त झाला.’

“मी आता मृत्यूच्या दाढेतून…”, युक्रेनमध्ये अडकलेल्या ‘त्या’ भारतीय विद्यार्थ्याची सोनू सूदने केली सुटका

तारक मेहता का उल्टा चष्मा हा कार्यक्रम गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. २००८ मध्ये सुरु झालेला हो कार्यक्रम गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आतापर्यंत या शोचे ३३९३ भाग पूर्ण झाले आहेत. या कार्यक्रमातील प्रत्येक पात्र घरोघरात लोकप्रिय आहे. जेठालाल, आत्माराम भिडे, पोपटलाल, डॉ. हाथी, कोमल भाभी, अंजली भाभी, माधवी, दयाबेन यांच्यासारखे अनेक कलाकार हे आता घराघरात लोकप्रिय ठरले आहेत.

The post महाशिवरात्रीच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे भिडे मास्तर ट्रोल, उत्तर देताना म्हणाले “आम्हा कलाकारांसाठी प्रेक्षक हेच…” appeared first on Loksatta.



Source link

हेही वाचा :  वडिलांच्या निधनानंतर रवीना टंडनने शेअर केले पंतप्रधान मोदींनी पाठवलेले शोकपत्र, म्हणाले “तुझे वडील…”

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलं ‘जय श्री राम’, शिक्षकाने केलं पास.. विद्यापिठाकडून कारवाई

Trending News : उत्तर प्रदेशमधल्या जौनपूर इथल्या वीर बहाद्दूर सिंह पूर्वांचल युनिव्हर्सिटीतल्या उत्तर पत्रिका तपासणीतल्या …