लखनौ सुपर जायंट्स संघाची जर्सी रिलीज, खास गोष्टींसह अनोख्या रंगात केएल राहुलचे शिलेदार मैदानात

Lucknow Super Giants : यंदा आयपीएलमध्ये 8 जागी 10 संघ खेळणार आहेत. नव्याने आलेल्य़ा दोन संघामध्ये लखनौ आणि गुजरात या दोन संघाचा समावेश असून य़ातील लखनौ सुपरजायंट्स संघाने नुकतीच त्यांनी जर्सी लॉन्च केली आहे. अॅक्वा रंगात असणारी ही जर्सी अगदी छोट्या छोट्या डिटेल्सने तयार केली आहे.

संघाचा लोगो तयार करताना तिरंग्याच्या रंगांशी साधर्म्य साधलं होत.गरुड पक्षाच्या आकाराचा लोगो तयार करण्यात आला असून या लोगोच्या मध्यभागी बॅट आहे. बॅटच्या मध्यभागी लाल रंगाचा चेंडूही लावण्यात आला होता. आता जर्सीमध्ये असलेल्या 3D लाईन्स गरुड पक्षीच दर्शवतात. शिवाय जर्सीमध्य़े भगवा आणि हिरवा रंगाच्या स्ट्राईप्स असल्याने त्यातूनही तिरंग्याचे रंग दर्शविले जातात. या सर्व डिटेल्सबाबत लखनौने जर्सीबाबत ट्वीट करताना नमूद केलं आहे.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा संघ 

लखनौ संघाचं कर्णधारपद राहुलकडे सोपवण्यात आलं आहे. लखनौ संघाची मालकी आरपी संजीव गोयंका ग्रुपकडे आहे. 24 जानेवारी रोजी लखनौ संघाच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. संजीव गोयंका यांच्या या नव्या संघाचं नाव  लखनऊ सुपर जायंट्स असे आहे. लखनऊ फ्रेंचायझीने चाहत्यांना आपल्या संघाचं नाव सुचवण्याची विनंती केली होती.  दरम्यान, 2017 मध्ये आरपी गोयंका ग्रुपने पुण्याचा संघ विकत घेतला होता. या संघाचे नाव रायझिंग पुणे सुपरजायंट्स ठेवण्यात आले होते. याच नावाशी मिळतं जुळतं नाव लखनौ संघाचं ठेवण्यात आले आहे. दरम्यान, आयपीएल लिलावाआधी लखनौ संघाने के. एल. राहुल, स्टॉयनिस आणि रवि बिश्नोई या तीन खेळाडूंना रिटेन केलं आहे. लखनौ संघाने राहुलला कर्णधारही केलं आहे. राहुलसाठी लखनौ संघाने 17 कोटी रुपये खर्च केले आहेत. तर ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू स्टॉयनिससाठी 9.2 कोटी रुपये मोजले आहेत. अनकॅप भारतीय रवि बिश्नोईला 4 कोटी रुपयात संघात ठेवलं आहे. तीन खेळाडूंसाठी लखनौ संघाने 30.2 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे लखनौ संघाकडे 59.8 कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी आयपीएलचा लिलाव पार पडणार आहे.  आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा संघ लखनौ ठरला आहे. संजीव गोएंका ग्रुपने तब्बल 7 हजार 90 कोटींना संघ विकत घेतला.  आयपीएलच्या इतिहासातील एक यशस्वी कर्णधार असणारा गौतम गंभीर मेंटॉर अर्थात मार्गदर्शक म्हणून संघासोबत जोडला गेला आहे.  तसेच झिम्बाब्वेचा माजी कर्णधार अँडी फ्लॉवरची (Andy Flower) लखनौचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

हेही वाचा :  न्यूझीलंडविरुद्ध टी20 सामन्यात कोणा-कोणाला मिळणार संधी? कशी असेल भारताची अंतिम 11

हे ही वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

D

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …