LSG vs CSK : चेन्नई विरुद्ध लखनौ आमने-सामने, अशी असू शकते संभाव्य अंतिम 11

RCB vs KKR : आज आयपीएल 2022 चा सातवा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानात पार पडणार आहे. आयपीएलमधील (IPL 2022) दमदार संघ चेन्नई सुपरकिंग्स आज दुसऱ्यांदा मैदानात उतरेल. तर त्यांच्या समोर यंदा नव्याने सामिल झालेला लखनौ सुपरजायंट्सचा संघ असणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघानी आपले पहिले सामने गमावल्याने त्यांना आता पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. चेन्नई सुपरकिंग्सला पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) तर लखनौला गुजरात टायटन्सने (GT) मात दिली आहे.  

आज पार पडणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स आणि लखनौ सुपरजायंट्स (CSK vs LSG) या सामन्यात दोन्ही संघाकडून नक्की कोणते खेळाडू मैदानात उतरतील हे नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल. पण त्यापूर्वी पहिला सामना आणि सध्याच्या फॉर्मचा विचार करता नेमके कोणते खेळाडू (Probable 11 for csk vs lsg) मैदानात उतरु शकतात यावर एक नजर फिरवूया…

चेन्नईची संभाव्य अंतिम 11  

ऋतुराज गायकवाड, रॉबीन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जाडेजा (कर्णधार), एमएस धोनी (विकेटकीपर), शिवम दुबे, मिचेल सँटनर, ड्वेन ब्राव्हो, अॅडम मिल्ने, तुषार देशपांडे

हेही वाचा :  डेव्हिड वॉर्नरसोबत 'हा' स्फोटक फलंदाज देणार सलामी, येथे पाहा दिल्ली कॅपिटल्सचा संभाव्य संघ

लखनौची संभाव्य अंतिम 11 

केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मनिष पांडे, एविन लुईस, कृणाल पंड्या, दीपक हुडा, आयुष बडोनी, आवेश खान, मोहसीन खान, रवी बिश्नोई, दुश्मिंता चमिरा 

हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …