लेकीच्या 18 व्या वाढदिवशी थेट चंद्रावर प्लॉट, आधीच्या गिफ्ट्सची यादी पाहून थक्क व्हाल!

Land On Moon: सध्या संपूर्ण देशाचे लक्ष इस्त्रोच्या चांद्रयान-३वर आहे. चांद्रयान-३ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. २३ ऑगस्ट रोजी चांद्रयान चंद्रावर सॉफ्ट लँडिग करणार आहे. एकीकडे संपूर्ण देश चांद्रयाना-३ मोहिमेबद्दल उत्सुक असताना देशातील एका व्यक्तीने थेट चंद्रावर जमीन खरेदी केली आहे. मुलीच्या 18व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी तिच्यासाठी हे गिफ्ट खरेदी केले आहे. तुम्हालाही वाटून आश्चर्य वाटलं ना? 

हिमाचल प्रदेशमधील हमीरपूर शहरातील वॉर्ड नंबर येथील रहिवासी वकिल अमित शर्मा यांनी त्यांच्या मुलीच्या 18 वाढदिवसानिमित्त थेट चंद्रावर जमीन खरेदी केली आहे. अमित शर्मा यांची मुलगी तनीश शर्मा हिचा आज म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. अमित यांच्या निर्णयाने सगळीकडे एकच आश्चर्य व्यक्त होत आहे. या पूर्वीही त्यांनी त्यांच्या लहान मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त अवयव दानाचा निर्णय घेतला होता. लोकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांनी अवयव दानाचा निर्णय घेतला होता.

अमित शर्मा यांना त्यांच्या मोठ्या मुलीसाठीही काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. त्यामुळं त्यांनी थेट चंद्रावर जमीन खरेदी करण्याचे ठरवले. अमित शर्मा यांनी लॉस एंजल्स इंटरनॅशनल लुनार लँड ऑफ अथॉरिटीकडून तब्बल 1 हेक्टर जमीन खरेदी केली आहे. लेकीसाठी चंद्रावर जमीन खरेदी करुन शर्मा यांनी अनोखा विक्रम रचला आहे. मुलीच्या वाढदिवसाला त्यांनी तिच्या हातात या जमिनीचे कागद हाती दिले आहेत. वडिलांचे गिफ्ट पाहून लेकही भारावली आहे. 

हेही वाचा :  'किती वेड्यात काढणार? फडणवीसांना सांगतोय की मराठा समाजाला...'; सभेआधीच जरांगे कडाडले

अमित शर्मा यांनी म्हटलं आहे की, मुलीला काही काहीतरी खास गिफ्ट द्यायचं होतं. काय गिफ्ट द्यावे याचा विचार करत असतानाच त्यांच्या मनात चंद्रावर जमिन खरेदी करण्याचा विचार आला. तेव्हा त्यांनी अमेरिकेतील लॉस एजेंल्स लॉस एंजल्स इंटरनॅशनलसोबत संपर्क साधला. एक हेक्टर जमिन खरेदी करण्यासाठी त्यांना 300 डॉलर इतका खर्च आला.

अमित शर्मा म्हणतात की, त्यांची मुलगी हे अनोखे गिफ्ट पाहून फारच आनंदित आहे. आता ती पृथ्वीवर राहून म्हणू शकेल की चंद्रावर माझी जमीन आहे. ती आज खूप आनंदित आहे. हे अनोखे गिफ्ट ती कायम लक्षात ठेवेल. अमित शर्मा यांची मुलगी तनिषा शर्मा चंदीगड येथील शाळेत शिकते.

अमित शर्मा यांनी त्यांच्या धाकट्या मुलीच्या वाढदिवसाला आठ अवयव दान करण्याचा निर्णय घेतला होता. मुलींच्याप्रती असणारे त्यांचे हे प्रेम पाहून परिसरात नेहमीच कौतुक होते. त्यांच्या परिवारात पती, पत्नी दोन मुली आणि त्यांची आई, असे छोटे कुटुंब आहे.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

भारतीयांची स्वप्नपूर्ती! ढगांवर तरंगणाऱ्या चिनाब पुलावर रेल्वेची यशस्वी ट्रायल; रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ

Chenab Railway Bridge : कोट्यवधी देशवासीयांचं स्वप्न आता साकार होणार आहे. जगातील सर्वात उंच ब्रिज …

महाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्ती

Sangali News : कन्नड आणि उर्दु शाळांमध्ये चक्क मराठी माध्यमिक शिक्षकांचे नियुक्ती करण्याचा अजब कारभार …