Lalita Shivaji babar : अमृता खानविलकरच्या ‘ललिता शिवाजी बाबर’चा टीझर आऊट!

Lalita Shivaji Babar Teaser Out : प्रसिद्ध धावपटू, आशियाई चॅम्पियन ‘माणदेशी एक्सप्रेस’ म्हणजेच ‘ललिता शिवाजी बाबर’ हिच्या आयुष्यावर आधारित ‘ललिता शिवाजी बाबर’ (Lalita Shivaji Babar) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते या सिनेमाचा टीझर लॉंच करण्यात आला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), ललिता बाबर, अमृता खानविलकरसह (Amruta Khanvilkar) अनेक मान्यवर उपस्थित होते. 

राष्ट्रीय विक्रम नावावर असलेल्या ललिता शिवाजी बाबरही या या कार्यक्रमादरम्यान भावूक झाली. ती म्हणाली की,”कठीण प्रसंगांचा सामना करून मी आज इथे पोहोचले आहे. आज माझा इथे सन्मान झाला, हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. मी अमृता खानविलकर यांच्यासह सगळ्यांचेच खूप आभार मानते”.  


‘ललिता शिवाजी बाबर’ यांची भूमिका साकारण्याचा मान मिळाल्याबद्दल अमृता खानविलकर म्हणाली,”आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘ललिता शिवाजी बाबर’ यांची छोटीशी झलक माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दाखवण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे. ललिता शिवाजी बाबर यांना समजून घेण्यासाठी, मागील एक-दीड वर्षांपासून मी घेतलेली मेहनत आज मार्गी लागली. ललिताताई बोलताना खूप भावनिक झाल्या. ताईंचे साधेपण, बोलणे मनाला भिडले. माझ्यासाठी हा खास क्षण आहे. आता कुठे प्रवास सुरू झाला आहे. अजून खूप पळायचे आहे”.  

हेही वाचा :  “मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

अमृताने शेअर केला व्हिडीओ

अमृता खानविलकरने टीझर लॉंच दरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं आहे,”एक संस्मरणीय संध्याकाळ… ललिता ताईंसोबतचा हा क्षण खरचं खूप कमाल होता”. अमृताच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्स करत तिला आगामी सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

‘ललिता शिवाजी बाबर’ कधी प्रदर्शित होणार? (Lalita Shivaji Babar Release Date)

‘ललिता शिवाजी बाबर’ (Lalita Shivaji Babar Movie) या सिनेमाचं पोस्टर आणि टीझरने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. चाहते आता सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा 26 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

संबंधित बातम्या

Lalita Shivaji babar: ‘माणदेशी एक्सप्रेस’ ललिता बाबरच्या आयुष्यावरील बायोपिकची घोषणा; ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री मुख्य भूमिकेतSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …