“लक्षात असू द्या, झुकणार नाही! वाघाच्या जबड्यात घालून हात दात मोजणाऱ्यांची आमची जात! | Ashish Shelar warns Mahavikas Aghadi government over notice from Mumbai Police to Devendra Fadnavis msr 87


देवेंद्र फडणवीसांना मुंबई पोलिसांकडून आलेल्या नोटीसीवरून आशिष शेलार यांचा महाविकास आघाडी सरकारला इशारा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी बदली घोटाळा, फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी नोटीस पाठवली असून, उद्या बीकेसीमधील सायबर पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: आज पत्रकारपरिषद घेत ही माहिती दिली. तसेच, निश्चितपणे मी उद्या ११ वाजता बीकेसीमधील सायबर पोलीस स्टेशनमध्ये जाणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं आहे. या पत्रकारपरिषदेस भाजपा नेते आशिष शेलार व विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची देखील उपस्थिती होती. मुंबई पोलिसांकडून फडणवीसांना पाठवण्यात आलेल्या नोटीसीवरून आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

“घोटाळ्यात थेट सहभाग दिसतो म्हणून चौकशीला बोलावले की, राजकीय सूडबुद्धीने असे तुणतुणे वाजवता. मग..घोटाळा झाल्याचे ज्यांनी उघड केले त्यांनाच दोषी असल्यासारखे चौकशीला बोलावता ही काय बालबुध्दी?लक्षात असू द्या, झुकणार नाही! वाघाच्या जबड्यात घालून हात दात मोजणाऱ्यांची आमची जात!” असं आशिष शेलार यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना मुंबई पोलिसांनी पाठवली नोटीस ; बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनला उद्या बोलावलं!

हेही वाचा :  Optical Illusion : या सत्र्यांच्या फोडीत लपलंय एक फळ...तुमच्या तीक्ष्ण नजरेने फक्त 10 सेकंदात शोधून दाखवा...

तर, “मुंबई पोलिसांनी मला नोटीस पाठवली आहे, बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनला उद्या ११ वाजता बोलावलं आहे. मी निश्चितपणे उद्या तिथे जाणार आहे. आता जी काही राज्य सरकारची परिस्थिती आहे आणि विशेषता परवाचा जो षडयंत्राचा भांडाफोड मी स्वत: केलाय. त्यामुळे राज्य सरकार आणि पोलीस किंवा पोलिसांमधील काही अधिकारी यांना आता त्याचं उत्तर सूचत नसल्याने, अशा प्रकारची नोटीस मला देण्यात आली आहे. मी निश्चितपणे उद्या ११ वाजता बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनला हजर राहील.” अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारपरिषद घेऊन माध्यमांना दिली आहे.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ATM वापराचं शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव; Per Transaction फी पाहून बसेल धक्का

Big News For Bank Customer: भारतातील एटीएम ऑपरेटर्सची संस्था असलेल्या कॉन्फीडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीने (Confederation …

अण्वस्त्रसज्ज चीननं वाढवली जगाची चिंता; पाकिस्तानही दहशतीच्या छायेखाली, भारतात काय चित्र?

SIPRI report : भारतीय सीमाभागात एकिकडे पाकव्याप्त (POK) काश्मीरमधून (Kashmir) सातत्यानं देशात घुसखोरीचा प्रयत्न केला …