कतरिना अन् सलमानच्या ‘टायगर-3’ चा धमाकेदार टीझर रिलीज; ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

Tiger 3 teaser :  सलमान खान (Salman Khan ) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या एक था टायगर आणि टायगर जिंदा है या दोन चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटाचा तिसरा भाग म्हणजेच टायगर-3 चा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा टीझर शेअर करून सलमाननं चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केले आहे. टीझरमधील कतरिना आणि सलमानच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

टीझरमध्ये कतरिनाचा डॅशिंग अंदाज दिसत आहे. टीझर शेअर करून सलमाननं कॅप्शनमध्ये लिहिले, ‘सर्वांनी स्वत:ची काळजी घ्या. टायगर-3 हा 21 एप्रिल 2023 म्हणजेच ईदला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘ हा चित्रपट तमिळ, हिंदी, तेलगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे, अशी माहिती देखील सलमाननं या पोस्टमधून दिली आहे. 

एक था टायगर आणि टायगर जिंदा है या चित्रपटांप्रमाणेच टायगर-3 ला देखील प्रेक्षकांची पसंती मिळेल का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच  प्रेक्षकांना मिळेल. सलमानच्या दबंग, बजरंगी भाईजान,अंतिम-द फायनल ट्रुथ, मैने प्यार किया,  या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.


 

हेही वाचा :  'आर आर आर' ते 'ब्रह्मास्त्र', बॉलिवूडचे 'हे' बिग बजेट चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज!

महत्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …