करीना कपूरची डाएटिशियन ऋजुता दिवेकरने उलगडली 3 वेटलॉस रहस्य, करीनाला 2 प्रेग्नेंसीनंतरही ऋजुताने असं बनवलं स्लिम-ट्रिम..!

हेल्थ आणि फिटनेसच्या बाबतीत, बरेच लोक सेलिब्रिटींना त्यांचे आदर्श मानतात आणि त्यांच्यासारखे बनू इच्छितात. विशेषतः बॉलिवूड अभिनेत्री फिटनेसच्या बाबतीत अनेकांच्या रोल मॉडेल असतात. उदाहरणार्थ, अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) योग, व्यायाम आणि हेल्दी फूडद्वारे फिटनेसला प्रोत्साहन देते आणि याच कारणामुळे तिचे चाहते सोशल मीडियावर तिचे तोंडभरून कौतुक करतात. करीना कपूर दोन मुलांची आई असूनही ती आजही पूर्णपणे फिट आहे. करीना मानते की अ‍ॅक्टिव्ह डेली रूटीन पाळण्याबरोबरच पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. कदाचित त्यामुळेच या वयातही करीना फिटनेसच्या बाबतीत कुणापेक्षा कमी नाही. दोन गर्भधारणेनंतर तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाने सर्वांनाच प्रेरणा दिली आहे.

यामुळेच फिट राहण्यासाठी करिना रोज काय खाते हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. साहजिकच, हे त्यांना त्यांचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यास मदत करू शकते. सेलिब्रिटी डाएटिशियन ऋजुता दिवेकर (Celebrity nutritionist Rujuta Diwekar) यांनी अलीकडेच करीनाच्या खाण्याच्या सवयींबद्दल काही रहस्ये उघड केली. दिवेकरने आपल्या ‘एटिंग इन द एज ऑफ डायटिंग’ या ऑडिओबुकमध्ये सांगितले की, करीना तिच्या झिरो साइज फिगरसाठी ओळखली जाते. तिने अशा काही टिप्स देखील सांगितल्या आहेत ज्या करीना नेहमी फॉलो करते. जर तुम्हालाही करिनासारखी फिगर मिळवायची असेल तर या सवयी तुमच्या डेली रुटीन मध्ये समाविष्ट करा.

हेही वाचा :  राज्यपाल कोश्यारींकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकेरी उल्लेख? VIDEO शेअर करत मिटकरींचे खडेबोल!

सकाळचा पॉवरपॅक आहे ब्रेकफास्ट

व्यायामाच्या 60 ते 90 मिनिटे आधी पौष्टिक आहार घ्या. यामुळे शरीराला फायबर मिळतात त्यामुळे व्यायाम करताना स्नायूंना कोणतेही नुकसान होत नाही आणि पूर्ण ऊर्जा मिळते. हे व्यायामानंतरही अधिक कॅलरी बर्न करण्यास मदत करते जे तुम्हाला चांगले परिणाम कमी वेळात देते.

(वाचा :- Mouth Cancer : सावधान, डॉक्टरांनी सांगितली माउथ कॅन्सरची मुख्य लक्षणे, म्हणाले फर्स्ट स्टेजमध्ये समजतही नाहीत माऊथ कॅन्सरचे ‘हे’ संकेत!)

वर्कआउट आणि डाएटची पूर्ण काळजी घेते करीना!

दुपारच्या जेवणानंतर लिंबू पाणी प्या

दुपारच्या जेवणानंतर थोड्या वेळाने लिंबूपाणी प्या. या पाण्यात काळे मीठ, साखर, केशर आणि थोडे आले मिसळून प्या. हे दुपारचा थकवा दूर ठेवते. केस आणि त्वचेसाठी केशर आश्चर्यकारक आहे तर आले आणि काळे मीठ यांचे मिश्रण आपल्याला हलके वाटण्यास मदत करते आणि वर्कआउट नंतर येणारी सूज टाळण्यास मदत करते.

हेही वाचा :  Quick weight loss tips : संपूर्ण शरीरावरची चरबी जाईल झटक्यात जळून, करा ‘ही’ 6 अतिमहत्त्वाची कामे!

(वाचा :- चहासोबत चुकूनही खाऊ नका ‘हा’ 1 पदार्थ, हाडे होतील कमजोर आणि वाढेल या 5 गंभीर आजारांचा धोका..!)

प्रेग्नेंसीनंतरही फिट आहे करीना कपूर..!

रात्री एकदम हलकं व साधं जेवण

रात्रीच्या जेवणात डाळ, भात व तूप किंवा खिचडी, दही किंवा दुधीची भाजी आणि ज्वारीची भाकरी खावी. रात्री लवकर जेवल्याने आणि पौष्टिक अन्नपदार्थ खाल्ल्याने चांगली झोप लागते. तसेच हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत होते. याचा शरीरावर अँटीएजिंग प्रभाव देखील असतो. सकाळी ताजेतवाने होऊन व लवकर उठणे आणि चांगली 8 तासांची झोप घेणे हे चांगले जीवन जगण्याचे मुलमंत्र आहेत.

(वाचा :- Ayurvedic herbs : झोपण्याआधी रूममध्ये जाळा ‘या’ वनस्पतीची 4 पानं, डायबिटीज, अनिद्रा, हृदयरोग, लो इम्युनिटीसारखे 6 आजार होतील मुळासकट दूर!)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?

Indian Railway : भारतीय रेल्वे मार्गानं प्रवाशांना कायमच प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी सातत्यानं काही प्रयत्न …

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, निर्देश देत न्यायालयाकडून यंत्रणांना खडे बोल

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : देशात सध्या लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) रणधुमाळीच्याच अवतीभोवती …