ज्या संक्रांतीला पुण्यावर खऱ्यारितीने संक्रांत आली…

Joshi Abhyankar Serial Murders : जोशी अभ्यंकर हत्याकांडाला (Joshi Abhyankar Serial Murders) 14 जानेवारीला सुमारे 47 वर्ष पूर्ण होतील. याच अनुषंगाने जनसंपर्क व सोशल मीडिया क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सीमा खंडागळे यांनी पुणे किलिंग्स जक्कल केस (Pune Killings: Jakkal Case) या नावाने या घटनेबद्दल मराठीमध्ये पॉडकास्ट सादर केला आहे.  या पॉडकास्टचे कथन हे  सिद्धार्थ नाईक याने केले आहे. तर या पॉडकास्टचा पहिला भाग अमेझॉन म्युझिकवर उपलब्ध झाला आहे.   

पॉडकास्टबद्दल बोलताना सीमा खंडागळे म्हणाल्या की, साल 1976 मध्ये एक दिवस आधीच म्हणजे 14 जानेवारीलाच संक्रांत आली होती आणि याच दिवशी राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप, सुहास चांडक यांनी त्यांच्याच कॉलेज अभिनव कला महाविद्यालयातील विद्यार्थी प्रशांत हेगडे या तरुणाचे खंडणीसाठी अपहरण करून हत्या केली होती. या प्रकारे महाराष्ट्राला हादरून ठेवणाऱ्या या गुन्ह्याची सुरुवात  झाली होती व पुढील दीड वर्ष पुण्यात 10 खून होऊन या गुन्ह्याचे सत्र थांबले. 

सीमा खंडागळे पुढे म्हणाल्या की, या हत्याकांडाबद्दल सखोल तपशील संशोधन करून या पॉडकास्टची निर्मिती करण्यासाठी मला तीन वर्षे लागली. या पॉडकास्टमध्ये या गुन्ह्यातील शोध प्रक्रियेतील त्रुटी ज्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती वाढली, या केसमधील सिरील किलिंगचे अंश तसेच या गुन्ह्याच्या सुरु होण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या  घटना व  जोडीला त्यावेळी असणारी देशातील आणीबाणी, बेरोजगारी इत्यादी गोष्टीवर सुद्धा प्रकाश टाकला आहे

हेही वाचा :  ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 'नाटू नाटू' वर परफॉर्मन्स

news reels

तर या पॉडकास्टचे कथन करणारे सिद्धार्थ नाईक म्हणाले की, हा पॉडकास्ट खऱ्या गुन्ह्यावर आधारित असल्यामुळे त्याला एक मानवी चेहरा देऊन मी  सादर  केला आहे. तसेच त्याकाळातील पुणेकरांच्या मनातील भीती  तणाव व या  हत्याकांडातील व्यक्ती तसेच  ठिकाणे मला माझ्या आवाजाद्वारे उभारायची  होती.  त्यामुळेच मला ही या हत्याकांडाबद्दलचे संशोधन करावे लागले.

संबंधित बातम्या

Sunil Holkar Passed Away : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील मराठमोळ्या अभिनेत्याचे निधन; वयाच्या 40 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …