JEE Mains Exam 2023: जेईई मेन परीक्षेचं हॉल तिकीट जारी, Direct Link डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

JEE Main Admit Card 2023:  देशातील सर्वोच्च अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे मुख्य  परीक्षा (JEE Main) घेतली जाते. लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. या परीक्षेचे सिटी स्लिप प्रसिद्ध झाल्यानंतर याचे हॉल तिकीट जारी करण्यात आले आहे. विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने हे हॉल तिकीट डाऊनलोड करु शकतात.

या परीक्षेसाठी अर्ज करणारे उमेदवार  jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवरुन हॉल तिकीट डाऊनलोड करु शकतात. परीक्षेआधी हॉल तिकीट डाऊनलोड करुन यात काही चुका असल्यास विद्यार्थी या चुका दुरुस्त करुन शकतात. जेणेकरुन ऐन परीक्षेच्या वेळी गोंधळ होणार नाही. 

जेईई मेन 2023 साठी सत्र 1 ची परीक्षा 24 जानेवारी 2023 पासून सुरू होणार आहे. परीक्षा 1 फेब्रुवारीला संपणार आहे. 24, 25, 29, 30, 31 आणि 1 फेब्रुवारी रोजी दोन सत्रामध्ये एक पेपर घेण्यात येणार आहे. तर, 28 जानेवारी दुसऱ्या सत्रात परीक्षा घेतली जाणार आहे. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकात परीक्षेची तारीख 24, 25, 27, 28, 29, 30 आणि 31 जानेवारी निश्चित करण्यात आली होती. सुधारित वेळापत्रकानुसार 27 आणि 28 जानेवारीला परीक्षा होणार नाही. 

हेही वाचा :  JEE Main 2023 : जेईई मेन परीक्षेसंदर्भातील मोठी बातमी; सर्व महत्त्वाच्या तारखा एका क्लिकवर

जेईई मेन 2023 च्या पेपर पॅटर्नमध्ये एकाधिक निवड प्रश्न (MCQ) आणि संख्यात्मक अशा स्वरुपाचे प्रश्न असणार आहेत. पेपर 1 – जेईई मेनच्या बीई, बीटेक पेपरमध्ये गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या तीन विभागांचा समावेश असेल. या विषयांचे 90  प्रश्न असणार आहेत. तर, पेपर 2A- BArc पेपरमध्ये गणित, अभियोग्यता चाचणी आणि रेखाचित्र असे तीन विभाग असतील, त्यात 82 प्रश्न असतील. तर जेईई मेन परीक्षेच्या पेपर 2B- B-प्लॅनिंग पेपरमध्ये गणित, अभियोग्यता चाचणी आणि नियोजनावर आधारित 105 प्रश्न असतील.

असं डाऊनलोड करा हॉल तिकीट

  • JEE च्या jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • वेबसाइटच्या होम पेजवर ताज्या बातम्यांच्या टॅबवर क्लिक करा.
  • आता JEE(मुख्य) 2023 सत्र प्रवेशपत्राच्या लिंकवर जा.
  • हॉल तिकीट डाउनलोड करा या लिंकवर क्लिक करा.
  • अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकून हॉल तिकीट डाउनलोड ऑप्शन सिलेक्ट करा.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि त्याचे प्रिंट आउट घ्या.
  • हॉल तिकीट व्यवस्थित तपासून घ्या
  • हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर यावर असलेले उमेदवारांचे नाव, पालकांचे नाव, परीक्षा केंद्राचा पत्ता, परीक्षेची तारीख, नाव आणि फोटो सर्व माहिती तपासून घ्या. यात काही चुका आढळल्यास NTA हेल्पलाइन क्रमांक 011-40759000 वर संपर्क साधून याबाबत माहिती द्या. 
हेही वाचा :  जेलमधून बाहेर आल्यावर तुझा नंबर! आई-वडिलांसह कुटुंबातील चार जणांना संपवणाऱ्या मुलाची भावाला धमकीSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Fathers Day 2024 : घरापासून लांब राहणारा मुलगाच समजू शकतो ही भावना; बाबा तुला कडक सॅल्यूट!

Happy Fathers Day 2024 : कोणत्याही भावनेत न बांधता येणारं, कोणत्याही शब्दांमध्ये व्यक्त न होणारं …

Quiz: असं कोणतं फळ आहे जे विमान प्रवासात घेऊन जाऊ शकत नाही?

GK Questions And Answer : फळं आणि भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाच्या असतात. म्हणूनच हिरव्या …