JEE Main Dates:’जेईई मेन’च्या तारखा जाहीर

Authored by Pravin Dabholkar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 16 Dec 2022, 11:31 am

JEE Main: इंजिनीअरिंग अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या ‘जेईई मेन’च्या तारखा जाहीर झाल्या असून, मराठीसह इतर १३ भाषांमध्ये ही परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध असेल. या परीक्षेचा पहिला टप्पा येत्या २४ ते ३१ जानेवारी या कालावधीत होईल. २६ जानेवारी रोजी, प्रजासत्ताकदिनी परीक्षा होणार नाही. परीक्षेचा दुसरा टप्पा एप्रिल महिन्यात होईल.

 

JEE Mains
‘जेईई मेन’च्या तारखा जाहीर

हायलाइट्स:

  • ‘जेईई मेन’च्या तारखा जाहीर
  • १३ भाषांमध्ये ही परीक्षा देण्याचा पर्याय
  • २४ ते ३१ जानेवारी या कालावधीत पहिला टप्पा
JEE Main 2023 Exam Date Notification: जेईई मेन २०२३ परीक्षेच्या तारखांची वाट पाहत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency, NTA) जेईई मेन २०२३ नोटिफिकेशन जाहीर केले आहे. अशा परिस्थितीत परीक्षेसाठी नोंदणी केव्हा होणार, कोणत्या तारखेला परीक्षा होणार, याची सर्व माहिती येथे उपलब्ध करून दिली जात आहे.

एनटीएने जाहीर केलेल्या नोटीसनुसार, जेईई मेन परीक्षा २०२३ मध्ये दोन सत्रांमध्ये घेतली जाईल. ज्यामध्ये पहिले सत्र जानेवारी महिन्यात आणि दुसरे सत्र एप्रिल महिन्यात होईल.

हेही वाचा :  यूजीसी आणि AICTE कडून क्रॉसवर्ड स्पर्धा २०२२ च्या नोंदणीला सुरुवात

नोंदणीला सुरुवात

जेईई मेन २०२३ च्या पहिल्या सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया १५ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ जानेवारीपर्यंत असेल. तर परीक्षा २४,२५,२७,२८, २९,३० आणि ३१ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे.

SSC CHSL 2022: स्टाफ सिलेक्शनकडून ४,५०० पदांची भरती, ८१ हजारपर्यंत मिळेल पगार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रतीक्षा

प्रवेशपत्र जानेवारीतच

याव्यतिरिक्त उमेदवारांसाठी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे शहर जाहीर केले जाणार आहे. त्याचबरोबर तिसऱ्या आठवड्यापासून परीक्षेची प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जातील. विद्यार्थी जेईई मेनच्या अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जाऊन परीक्षेसाठी जारी केलेली संपूर्ण सूचना तपासू शकतात.

जेईई मेन परीक्षेत २ पेपर

जेईई मेन परीक्षेत २ पेपर असतील. ज्यामध्ये एनआयटी, आयआयटी आणि इतर संस्थांमधील बीई, बीटेक अभ्यासक्रमांना पहिल्या पेपरद्वारे प्रवेश दिला जातो. दुसरीकडे दुसऱ्या पेपरच्या माध्यमातून बी.आर्क आणि बी.प्लॅनिंगसारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
राज्यात ग्रामसेवकची पदांची बंपर भरती, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

हेही वाचा :  CISF Recruitment 2023

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत विविध पदांची भरती

Dehu Road Cantonment Board Invites Application From 11 Eligible Candidates For Balwadi Teacher & Balwadi …

भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीरवायु पदांची भरती

Indian Air Force Agniveervayu Recruitment 2024 – Indian Air Force Invites Application From Eligible Candidates …