IPL 2022, CSK vs KKR LIVE Updates : चेन्नई आणि कोलकाता यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

IPL 2022, CSK vs KKR : नव्या रंगात… नव्या ढंगात… आयपीएलचा नवा मोसमाला सुरुवात होणार आहे. आयपीएलचा रणसंग्रामाला अवघे काही तास उरले आहेत. गतविजेते चेन्नई सुपरकिंग्स आणि उपविजेते कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये पहिला सामना रंगणार आहे. यंदा आयपीएलमध्ये दोन नव्या संघाची भर पडली आहे, त्यामुळे एकूण संघाची संख्या दहा झाली आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातील चार मैदानावर 70 सामने होणार आहेत. तब्बल दोन महिने आयपीएलचा कुंभमेळावा रंगणार आहे. मागील 14 वर्ष आयपीएलनं भारतासह जगभरातल्या क्रिकेटप्रेमींना मनोरंजनाचा बंपर डोस दिला. पण यंदाच्या नव्या मोसमात बीसीसीआयनं स्पर्धेच्या रुपरेषेत अनेक बदल केले आहेत. आयपीएलच्या 15 व्या हंगामाची सुरुवात गतविजेता चेन्नई सुपरकिंग्स आणि उपविजेता कोलकाता नाइट रायडर्स यांच्या सामन्याद्वारे होणार आहे. दोन्ही संघ नव्या कर्णधारसोबत मैदानात उतरणार आहेत. चेन्नईच्या कर्णधारपदाची धुरा रवींद्र जाडेजाच्या खांद्यावर आहे तर कोलकाताचं नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. श्रेयस अय्यरने याआधी दिल्ली संघाचं नेतृत्व केले आहे. तर रवींद्र जाडेजा पहिल्यांदाच नेतृत्व करत आहे. 

आयपीएलच्या पहिला हंगाम 2008 मध्ये खेळण्यात आला होता. या हंगामातील अंतिम सामन्यात चेन्नईच्या संघाला राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर 2010 मध्ये चेन्नईनं मुंबई इंडियन्सला धूळ चाखून पहिली ट्राफी जिंकली होती. 2011 मध्ये चेन्नईच्या संघानं त्यांची दुसरी ट्रॉफी जिंकली. 2016 आणि 2017 मध्ये स्पॉट फिक्सिंगप्रकरणी चेन्नईच्या संघावर दोन वर्षाची बंदी घालण्यात होती. त्यानंतर 2018 मध्ये सनरायझर्सला अंतिम सामन्यात पराभूत करून चेन्नईनं तिसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरलं. परंतु, 2020 मध्ये चेन्नईला काही खास कामगिरी करता आली नाही. या हंगामात चेन्नईचा संघ प्लेऑफमध्येही स्थान मिळवू शकला नाही. मात्र, 2021 मध्ये महिंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईनं चौथ्यांदा आयपीएलची ट्रॉफी उचलली. आता चेन्नईचं नेतृत्व रविंद्र जाडेजा करणार आहे. चेन्नईसाठी जमेची बाजू म्हणजे,  2021 मधील अनेक खेळाडू लिलावात पुन्हा खरेदी करण्यात आले आहेत. त्यामुळे संघबांधणीसाठी फारसा वेळ लागणार नाही. कोलकाता संघाचा विचार केल्यास यंदा कोलकाता संघाची धुरा श्रेयस अय्यरच्या खांद्यावर आहे. केकेआरने यंदाच्या महालिलावापूर्वी आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, वेंकटेश अय्यर, सुनील नारायण या चौघांना रिटेन केलं होतं. त्यानंतर महालिलावात त्यांनी तब्बल 12.25 कोटी मोजत श्रेयस अय्यरला संघात सामिल केलं. याशिवाय पॅट कमिन्स, नितीश राणा, शिवम मावी यांच्यासाठीही मोठी रक्कम मोजली. 

हेही वाचा :  दुसऱ्या कसोटीवर भारताची मजबूत पकड, सामन्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

चेन्नई सुपर किंग्सचे शिलेदार –
रवींद्र जाडेजा (16 कोटी), महेंद्रसिंग धोनी (12 कोटी), मोईन अली (8 कोटी), ऋतुराज गायकवाड (6 कोटी), रॉबिन उथाप्पा (2 कोटी), ड्वेन ब्राव्हो (4.40 कोटी), अंबाती रायुडू (6.75 कोटी), दीपक चहर (14 कोटी), शिवम दुबे (4 कोटी), महिश तिक्षाना (70 लाख), सिमरनजीतसिंग (20 लाख), डेवॉन कॉनवे (1 कोटी), ड्वेन प्रिटोरियस (50 लाख), मिचेल सॅन्टनर (1.90 कोटी), अडम मिल्न (1.90 कोटी), केएम आसिफ (20 लाख), तुषार देशपांडे (20 लाख). शुभ्रांशु सेनापती (20 लाख), मुकेश चौधरी (20 लाख), प्रशांत सोळंकी (1.20 कोटी) ,ख्रिस जॉर्डन (3.60 कोटी), एन जगदीशन (20 लाख), सी. हरी निशांत(20 लाख), भगत वर्मा(20 लाख), राजवर्धन हंगरगेकर (1.50 कोटी)

कोलकाता नाईट रायडर्सचा संघ – 
आंद्रे रस्सेल (12 कोटी), वरुण चक्रवर्ती (8 कोटी), वेंकटेश अय्यर (8 कोटी), सुनील नारायण (6 कोटी), पॅट कमिन्स (7.25 कोटी), श्रेयस अय्यर (12.25 कोटी), नितीश राणा (8 कोटी), शिवम मावी (7.25 कोटी), शेल्डन जॅकसन (60 लाख), अजिंक्य रहाणे (1 कोटी), रिंकू सिंह (55 लाख), अनुकूल रॉय (20 लाख), रसिक डार (20 लाख), बाबा इंद्रजीत (20 लाख), चमिका करुणारत्ने (50 लाख), प्रथम सिंह (20 लाख), अभिजीत तोमर (40 लाख), अशोक शर्मा (55 लाख), सॅम बिलिंग्स (2 कोटी), आरॉन फिंच (1.5 कोटी), टीम साऊदी (1.5 कोटी), रमेश कुमार (20 लाख), मोहम्मद नबी (1 कोटी), उमेश यादव (2 कोटी), अमान खान (20 लाख)

हेही वाचा :  VIDEO : आयपीएल 2023 पूर्वी मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी, जोफ्रा आर्चरनं सुरु केली प्रॅक्टिस

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …