IPL 2022 Auction : अकोल्याच्या पोरांना आयपीएलचं तिकीट, गुजरात-पंजाब फ्रेंचायझींनी घेतलं विकत

IPL 2022 Auction : आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी बंगळुरु येथे 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी लिलाव झाला. दोन दिवसांत 10 फ्रेचायझींनी 204 खेळाडूंना खरेदी केलं, यासाठी 5,51,70,00,000 रुपये खर्च केले आहे. 67 विदेशी आणि 137 भारतीय खेळाडूंवर बोली लागली. या लिलावात अनेक महाराष्ट्राच्या क्रिकेटपटूंचे नशीब उजळले. अनेकांना संधी मिळाली. तर अनेकजण अनसोल्डही राहिले. दोन दिवसांच्या लिलावात अकोल्याच्या दोन क्रिकेटपटूंना खरेदी कऱण्यात आले आहे. पंजाब आणि गुजरात संघांनी या दोन क्रिकेटपटूंना आपल्या संघात घेतलं आहे. अथर्व तायडेवर ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’ने 20 लाखांची बोली लावली. तर दर्शन नळकांडेवर गुजरात टायटन संघाने 20 लाखांना खरेदी केलं. आयपीएलसारख्या स्पर्धेत दोन खेळाडूंची निवड झाल्याने अकोल्याच्या क्रीडाविश्वात मोठा आनंद आहेय.

आयपीएल… क्रिकेटचं भावविश्व बदलविणारी स्पर्धा… क्रीकेटमधील ग्लॅमरस ठरलेल्या आयपीएलच्या नव्या पर्वासाठी काल खेळाडूंचा लिलाव पार पडलाय. यात अनेक खेळाडूंना कोट्यवधींची बोली लावत फ्रँचाईजींनी खेळाडूंना मालामाल केलं. यात अकोल्याच्या दोन खेळाडूंना आयपीएलची लॉटरी लागली. यातील दर्शन नळकांडेवर गुजरात टायटन संघाने 20 लाखांची बोली लावलीय. तर अथर्व तायडेवर ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’ने 20 लाखांची बोली लावली. हे दोघेही अकोला क्रिकेट क्लबचे खेळाडू आहेत. अकोल्याच्या क्रिकेट क्लब मैदानावर या दोघांनीही क्रिकेटचे धडे गिरवले आहेत.

कोण आहे दर्शन नळकांडे?

दर्शनचे वडील सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीला आहेत. तर वकील असलेली त्याची आई अकोला विधी महाविद्यालयात व्याख्याता आहे. हे कुटूंब अकोल्यातील जठारपेठ भागात राहते. दर्शनची चारवेळा आयपीएलमध्ये निवड झाली. मात्र, यावेळी गुजरात संघातून त्याला प्रत्यक्ष खेळायला मिळेल अशी अपेक्षा त्याच्या पालकांना आहे. मागच्या वर्षीही दर्शन आणि अथर्वची आयपीएलमध्ये निवड झाली होती. मात्र, त्यांना खेळायची संधी मिळाली नव्हतीय. मात्र, यावेळी संधीचं सोनं करू असा विश्वास दर्शनला आहे.

दर्शनची आतापर्यंतची कामगिरी

1) दर्शन हा अष्टपैलू खेळाडू आहेय. शेवटच्या शटकांमध्ये चांगली फलंदाजीही करतो.

2) दर्शनने यावर्षी ‘मुश्ताक अली टी – 20’ स्पर्धेत चार चेंडूत चार बळी घेतले होते.

3) असा पराक्रम करणारा तो भारताचा दुसरा तर जगातला नववा गोलंदाज ठरला होता.

4) यावर्षी रणजीच्या मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेत दर्शननं 13 बळी घेत टॉप 5 मध्ये स्थान पटकावले.

5) गेल्या तीन वर्षांपासून दर्शन रणजीच्या मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेत टॉप 5 मध्ये आहे. या स्पर्धेत तीन वर्षांत दर्शनच्या नावावर 40 विकेट्सची नोंद.

अथर्व तायडे कोण आहे?

पंजाबकडून खेळणारा अथर्व तायडे हा सुद्धा अष्टपैलू खेळाडू आहे. अथर्वचे वडील अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात प्राध्यापक आहेत. तर आई देवयानी या गृहिणी आहेत. हे कुटूंब अकोल्याच्या शास्त्री नगर परिसरात राहते. अथर्वच्या निवडीचा त्याच्या कुटूंबियांसह प्रशिक्षकांनाही आनंद आहे.

अथर्व तायडेची आतापर्यंतची कामगिरी

1) 2018-19 च्या हंगामात कुचबिहार ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 19 वर्षाखालील संघात 320 धावांची सर्वोच्च खेळी.

2) अथर्वच्या नेतृत्वात 2014 मध्ये 14 वर्षाखालील संघानं राजसिंग डूंगरपूर सिरीज जिंकली. या स्पर्धेत अथर्वला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला आहे. 

3) 2017-18 मध्ये आशिया कप चषकमध्ये 19 वर्षाखालील भारतीय संघात सहभाग.

4) 2017-18 मध्ये 19 वर्षाखालील भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला होता. यात अथर्वनं सलग दोन शतकं लगावली होती.

 5) कौंटी क्रिकेटमध्ये लँकेशायर संघाशी करारबद्ध. या सिरीजमध्ये 16 सामन्यात 1100 धावा. 61 बळी घेतले आहेत.

अथर्व आणि दर्शन या दोघांच्याही कामगिरीकडे संपूर्ण अकोल्यातील क्रीडा प्रेमींचं लक्ष असेल.  

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमचा विश्वविक्रम, गिनिज बुकमध्ये झाली नोंद

 Narendra Modi Stadium Ahmedabad: अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर 2022 मध्ये झालेल्या आयपीएल फायनल सामन्याने …

IND vs NZ: टीम इंडियाच्या नावावर आगळावेगळा विक्रम, प्रत्येक 25वा एकदिवसाय सामना रद्द

<p style="text-align: justify;"><strong>IND vs NZ 2nd ODI: &nbsp;</strong>पावसामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना …