Indian Navy Recruitment 2024: भारतीय नौदलात नोकरीची संधी, 254 पदांसाठी भरती, येथे करा अर्ज

Indian Navy Recruitment 2024: भारतीय नौदलात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर येतेय. इंडियन नेव्हीमध्ये नोकरीची संधी आहे. इंडियन नेव्हीने शॉर्ट सर्व्हिस कमीशन पदासाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. 254 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. इच्छु उमेदवार नेव्हीच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करु शकतात. 

https://www.joinindiannavy.gov.in  या वेबसाइटवर जाऊन उमेदवार अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया 24 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून इच्छुक उमेदवार 10 मार्च 2024 पर्यंत अर्ज पाठवू शकता. त्यानंतर अर्ज पाठवता येणार नाही. तसंच, जे उमेदवार अविवाहित आहेत तेच या पदांसाठी पात्र आहेत, असं अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे. 

Indian Navy Recruitment 2024: महत्ताचे निवेदन 

संस्था- इंडियन नेव्ही

रिक्त पदाचे नाव- शॉर्ट सर्व्हिस कमीशन (SSC)

अधिसूचना जारी झालेली तारीख- 19 फेब्रुवारी 2024

अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया- 24 फेब्रुवारी 2024

हेही वाचा :  Sarkari Naukri 2023 : 12वी पास विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी; आजच करा अर्ज

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख- 10 मार्च 2024

रिक्त पदांची संख्या-254

अधिकृत वेबसाइट- https://www.joinindiannavy.gov.in

 Indian Navy Recruitment 2024: कोणती पदे रिक्त

– जनरल सर्विस – 50 पदे (पुरुष/महिला) (महिलांसाठी जास्तीत जास्त १५ पदे)

– पायलट, एयर ट्रैफिक, नेवल एयर ऑपरेशन – 46 पदे 

– लोजिस्टिक्स- 30 पदे

– नवल अमेडमेंट – 10 पदे

– एजुकेशन – 18 पदे

– इंजीनियरिंग ब्रांच -30 पदे

– इलेक्ट्रिक ब्रांच – 50 पदे

– नवल कंस्ट्रक्टर -20 पदे

Indian Navy Recruitment 2024 उमेदवारांची पात्रता

नेव्हीमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना मान्यताप्राप्त बोर्डातून 60 टक्क्याहून अधि अंकानी पदवीधर असणे गरजेचे आहे. या भरतीसंदर्भातील अधिक तपशील तु्म्ही अधिसूचनेत पाहू शकता. 

Indian Navy Recruitment 2024 साठी अर्ज कसा कराल?

नेव्ही एसएससी अधिकारी पदांसाठी अर्ज करण्यासाठी या नियमांचे पालन करा. 

पहिला टप्पा- नौदलाची वेबसाइट  join Indiannavy.gov.in जा

दुसरा टप्पा- वेबसाइटवर दिलेल्या अर्ज भरा यावर क्लिक करा

तिसरा टप्पा- अर्ज भरण्यास सुरुवात करा

चौथा टप्पा- आवश्यक कागदपत्रे जोडा

पाचवा टप्पा- अर्जासाठी आवश्यक असलेले शुल्क भरा. 

हेही वाचा :  7 वर्षाच्या मुलाला 40 टाके; नायलॉन मांजाने गळा कापला

सहावा टप्पा- अर्जाची एक प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवाSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ATM वापराचं शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव; Per Transaction फी पाहून बसेल धक्का

Big News For Bank Customer: भारतातील एटीएम ऑपरेटर्सची संस्था असलेल्या कॉन्फीडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीने (Confederation …

‘मोदींच्या मनमानीविरुद्ध..’, ‘सत्तेतले नक्षलवादी’ म्हणत ठाकरे गटाची शिंदे-फडणवीस, मोदी-शाहांवर टीका

Urban Naxal Issue: शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कठोर शब्दांमध्ये टीकास्र सोडलं …