फेब्रुवारी 27, 2024

भारत- वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात विक्रमांचा पाऊस

IND vs WI 1st T20: वेस्ट इंडीजविरुद्ध कोलकात्याच्या ईडन गार्डनवर बुधवारी (16 फेब्रुवारी) खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं 6 विकेट्सनं विजय मिळवलाय. या विजयासह भारतानं तीन सामन्याच्या टी-20 मालिकेत 1-0 नं आघाडी घेतली आहे. दरम्यान, पहिल्या टी-20 सामन्यात अनेक विक्रमांची नोंद झालीय. तर, पहिल्या टी-20 सामन्यात नेमकं कोणकोणत्या विक्रमांची नोंद झालीय? याबाबत जाणून घेऊयात.

वेस्ट इंडीजविरुद्ध खेळण्यात आलेल्या टी-20 सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वेस्ट इंडीजच्या संघानं 20 षटकात 7 विकेट्स गमावून भारतासमोर 158 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात भारतानं 4 विकेट्स गमावून 18.5 षटकात 162 धावा केल्या. भारताकडून रोहित शर्मानं सर्वाधिक 40 धावा केल्या.

सर्वाधिक टी-20 सामने खेळण्याच्या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर
रोहीत शर्माचा हा 120 वा टी-20 सामना होता. आता तो आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळणार दुसरा फलंदाज ठरलाय. त्यानं पाकिस्तानच्या मोहम्मद हाफिजला (119 सामने) मागे टाकलंय. या यादीत पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक अव्वल स्थानी आहे. शोएब मलिकनं 124 टी-20 सामने खेळले आहेत.

टी-20 क्रिकेटमध्ये भारताचं वेस्ट इंडीजविरुद्ध प्रदर्शन
2018 पासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 10 टी-20 सामने झाले आहेत. ज्यामध्ये भारताचा हा 9वा विजय आहे. यासह, सर्व आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचा वेस्ट इंडिजविरुद्धचा हा 100 वा विजय आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या वेस्ट इंडीजविरुद्ध सर्वाधिक धावा
रोहित शर्माने टी-20 क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 559 धावा केल्या आहेत. वेस्ट इंडीजविरुद्ध सर्वाधिक टी-20 धावा करण्याच्या विक्रम पाकिस्तानच्या बाबर आझमच्या नावावर होता. त्यानं वेस्ट इडीजविरुद्ध आतापर्यंत 540 धावा केल्या आहेत.

टी-20 मध्ये भारताकडून पदार्पण करणारा रवी बिश्नोई 95 वा खेळाडू
टी-20 क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण करणारा रवी विश्नोई 95 वा खेळाडू ठरलाय. तसेच त्यानं फिरकीपटू म्हणून भारतासाठी पदार्पणाच्या T20 सामन्यात तिसरी सर्वोत्तम गोलंदाजी (2/17) केली. या यादीत प्रज्ञान ओझा (4/21 वि. बांगलादेश, 2009) आणि अक्षर पटेल (3/17 वि. झिम्बाब्वे, 2015) त्याच्या पुढे आहेत.

ईशान किशनच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद
वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात इशान किशननं 42 चेंडूत 35 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 83.33 इतका होता. 40+ चेंडू खेळल्यानंतर सर्वात कमी स्ट्राइक रेटनं फलंदाजी करणारा तो भारतीय फलंदाज ठरलाय

हे देखील वाचा-

Ranji Trophy Return : रणजी करंडक स्पर्धेला आजपासून प्रारंभ! पडद्यामागून केलेल्या प्रयत्ननामुळे हे शक्य झालं : जय शाह

IND vs WI, 1st T20: पहिल्या टी20 सामन्यात भारत विजयी, मालिकेत 1-0 ची आघाडी

IND vs WI, 1st T20: भारताच्या कसून गोलंदाजीसमोर निकोलस पूरन खंबीर, भारतासमोर 158 धावाचं लक्ष

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha
[yt]https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA[/yt]

हेही वाचा :  भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्याला सुरुवात; पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …