भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिका; तिसऱ्या लढतीतही भारत पराभूत


अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने तीन बळी मिळवत छाप पाडली. परंतु भारतीय संघ तिसऱ्या सामन्यातही शुक्रवारी अपयशी ठरला. त्यामुळे यजमान न्यूझीलंडने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी मिळवली आहे.

तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ४९.३ षटकांत सर्व बाद २७९ अशी धावसंख्या उभारली. सलामीवीर सब्भीनेनी मेघना (६१), शफाली वर्मा (५१) आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा (नाबाद ६९) यांच्या अर्धशतकांनी भारताच्या धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. मग न्यूझीलंडची सुरुवात २ बाद १४ अशी खराब झाली. परंतु अ‍ॅमी सॅटरवेट (५९) आणि अमिलिया कर (६७) यांच्या १०३ धावांच्या भागीदारीमुळे न्यूझीलंडचा डाव सावरला. मग आणखी तीन फलंदाज तंबूत परतल्यामुळे न्यूझीलंडची ३५व्या षटकात ६ बाद १७१ अशी अवस्था झाली. परंतु लॉरेन डाऊनच्या नाबाद ६४ धावांमुळे न्यूझीलंडने या सामन्यात निसटता विजय मिळवला.

संक्षिप्त धावफलक

भारत : ४९.३ षटकांत सर्व बाद २७९ (दीप्ती शर्मा नाबाद ६९, सब्भीनेनी मेघना ६१; हन्ना २/५२, रोसमेरी मैर २/४३) पराभूत वि. न्यूझीलंड : ४९.१ षटकांत ७ बाद २८० (अमिलिया कर ६७, लॉरेन डाऊन नाबाद ६४, अ‍ॅमी सॅटरवेट ५९; झुलन गोस्वामी ३/४७)

हेही वाचा :  …आणि नेहमीच्या गर्दीसोबत चक्क रेल्वेमंत्रीही लोकलमध्ये चढले! ठाणेकरांना आश्चर्याचा धक्का!

‘पराभवांची चिंता नाही’

भारतीय महिला संघाने न्यूझीलंड दौऱ्यातील चारही सामने गमावले आहेत. मात्र, या पराभवांची प्रशिक्षक रमेश पोवार यांना चिंता वाटत नसून निराशाजनक कामगिरीला विलगीकरणाचा अतिरिक्त कालावधी कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘‘आम्हाला सराव करण्यासाठी केवळ तीन दिवसांचा कालावधी मिळाला. न्यूझीलंड दौऱ्याच्या तयारीसाठी इतका कमी कालावधी पुरेसा नाही,’’ असेही पोवार म्हणाले.

The post भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिका; तिसऱ्या लढतीतही भारत पराभूत appeared first on Loksatta.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …