IND vs NZ : टीम इंडिया पोहचली न्यूझीलंडमध्ये, हार्दिक-केनचं ट्रॉफीसोबत खास फोटोशूट

IND vs NZ, T20 Cricket : भारतीय संघ (Team India) आता न्यूझीलंड दौऱ्यावर (India tour of New Zealand) असून टी20 विश्वचषकानंतर लगेचच टीम इंडिया मैदानात उतरत आहे. भारताचं नेतृत्त्व हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्याकडे असणार आहे. तर न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) हाच असेल. दरम्यान शुक्रवार अर्थात 18 नोव्हेंबरपासून सामन्यांना सुरुवात होणार असून त्यापूर्वी दोन्ही कर्णधारांनी ट्रॉफीसोबत खास फोटोशूट केलं आहे. एक अगदी सुंदर अशी ट्रॉफी दिसत असून दोघेही एका खास प्रकारच्या सायकलची सैर करताना दिसत आहेत. स्पर्धेत आधी 3 टी20 आणि नंतर 3 वन डे सामने होणार असून पहिला सामना वेलिंग्टनच्या मैदानावर रंगणार असून त्याठिकाणीच हे फोटो शूट करण्यात आलं आहे. तर या दौऱ्याचं वेळापत्रक तसंच सामन्यांसंबधी सर्व माहिती पाहूया एका क्लिकवर…

कधी, कुठं रंगणार सामने?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना 18 नोव्हेंबर रोजी वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर खेळला जाईल. त्यानंतर दुसरा टी-20 सामना 20 नोव्हेंबर आणि तिसरा टी-20 सामना 22 नोव्हेंबर रोजी अनुक्रमे माउंट मॉन्गनुई आणि नॅपियर येथे खेळला जाईल. दरम्यान, एकदिवसीय मालिकेला 25 नोव्हेंबर ईडन पार्क येथे होईल. त्यानंतर दुसरा एकदिवसीय सामना 27 नोव्हेंबर रोजी सीडन पार्क आणि तिसरा एकदिवसीय साममना 30 नोव्हेंबर रोजी हेग्ले ओवल येथे पार पडणार आहे. 

हेही वाचा :  मयंक अग्रवाल पंचाबचा नवा कर्णधार? लवकरच घोषणा होणार

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेच वेळापत्रक:

Reels







सामना तारीख ठिकाण
पहिला टी-20 सामना 18 नोव्हेंबर वेलिंग्टन
दुसरा टी-20 सामना 20 नोव्हेंबर माउंट मॉन्गनुई
तिसरा टी-20 सामना 22 नोव्हेंबर नॅपियर

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक:







सामना तारीख ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 25 नोव्हेंबर ऑकलँड
दुसरा एकदिवसीय सामना 27 नोव्हेंबर हेमिल्टन
तिसरा एकदिवसीय सामना 30 नोव्हेंबर क्राइस्टचर्च

टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ:
हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ:
शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, शहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपक चाहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

हे देखील वाचा-

  • IPL 2023 : पोलार्ड-ब्रावो रिलीज, कार्तिक-जाडेजाला केलं रिटेन, पाहा CSK, DC, RCB, SRH, KKR, PBKS, LSG, RR, MI, GT संघातील खेळाडूंची यादी

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …