ज्याला तुम्ही साधारण ताप समजत आहात तो असू शकतो कॅन्सरचा ताप, या 5 लक्षणांवरून ओळखा..!

ताप येणे ही सामान्य समस्या आहे आणि आलेला ताप तीन-चार दिवसात किंवा आठवड्यात बरा सुद्धा होतो. शरीराचे तापमान वाढणे याला मेडिकल भाषेत पायरेक्सिया (pyrexia) म्हणतात. ताप येण्याची अनेक कारणे आहेत. पण तुम्हाला माहित आहे का शरीरात कोणत्याही प्रकारचा कर्करोग वाढत असल्याने देखील ताप येऊ शकतो. कर्करोग शरीराच्या टिश्यूंवर हल्ला करतो आणि हळूहळू त्यांचे नुकसान करतो आणि दिवसागणिक वाढतच जातो. यामुळे तुमच्या शरीराचे तापमान वाढू शकते ज्यामुळे तुम्हाला ताप येऊ शकतो.

असे म्हटले जाते की, ब्लड कॅन्सरसोबत अनेक प्रकारचे कॅन्सर शरीराचे तापमान वाढवू शकतात. चिंतेची बाब म्हणजे अनेकांना हा ताप हवामानातील बदलामुळे आहे की सर्दी-फ्लूमुळे आहे की शरीरात वाढणा-या कॅन्सरच्या पेशींमुळे आहे हे समजत नाही. कॅन्सरमधील ताप हा सामान्य तापापेक्षा कसा वेगळा असतो आणि तुम्ही कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हेच आपण आज जाणून घेऊया. (फोटो सौजन्य :- iStock)

ब्लड कॅन्सरमध्ये तापाचा जास्त धोका

ब्लड कॅन्सरमध्ये तापाचा जास्त धोका

ताप हे सर्व प्रकारच्या कर्करोगाचे एक सामान्य लक्षण आहे. ल्युकेमिया आणि लिम्फोमा सारख्या ब्लड कॅन्सर मध्ये तर हे लक्ष दिसतेच दिसते. जेव्हा कर्करोगाच्या रूग्णांमध्ये पायरेक्सिया असतो, तेव्हा हे सामान्यतः कर्करोग उद्भवल्याचे किंवा पसरल्याचे लक्षण असते. कॅन्सर रिसर्च यूकेच्या मते, या प्रकारच्या तापामुळे अस्वस्थता येते. हे लक्षण दिसणे म्हणजे रूग्णासाठी आणि त्याच्या काळजी घेणाऱ्यांसाठी चिंतेची बाबा असते. अशावेळी वेळीच वैद्यकीय सहाय्यता मिळवणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा :  लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे-शिंदे एकत्र येणार? प्रकाश आंबेडकर यांचा खळबळ दावा

(वाचा :- पोट सतत टम्मं फुगतं व साफ होत नाही, भूक लागत नाही, मग खा Gas-Acidity एका झटक्यात मुळापासून उपटणारे हे 8 पदार्थ)​

अन्य कॅन्सरमध्येही येतो ताप

अन्य कॅन्सरमध्येही येतो ताप

ब्रेस्ट कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, आतड्याचा कॅन्सर यांमध्ये ताप येण्याची शक्यता कमी असते. तथापि, अशा प्रकारच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीचा ट्यूमर यकृतामध्ये पसरला असल्यास त्याला ताप येऊ शकतो. कर्करोगामुळे शरीरात कुठेतरी अडथळा निर्माण होत असल्याचेही हे लक्षण असू शकते. जर तुम्हाला असे लक्षण दिसले तर अशावेळी त्याकडे दुर्लक्ष न करता थेट डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यायला सुरुवात करावे.

(वाचा :- How to Lower Ammonia : डायबिटीजपेक्षाही भयंकर अमोनिया रक्तात घुसून सडवतो किडनी व लिव्हर, ताबडतोब करा हे 5 उपाय)​

ताप कोणत्या गोष्टीमुळे येतो?

ताप कोणत्या गोष्टीमुळे येतो?

काही प्रकारच्या कर्करोगांमुळे जास्त ताप का येतो हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. असे मानले जाते की काही रोग विषारी पदार्थ तयार करतात, ज्यामुळे ताप येऊ शकतो. असे म्हटले जाते की ट्यूमरच्या निर्मितीमुळे पायरोजेन्स होऊ शकतात. हा एक विषारी पदार्थ आहे ज्यामुळे ताप येतो. त्यामुळे या गोष्टीवर अजून संशोधन सुरु आहे आणि आजवर ठोस अशी माहिती उपलब्ध नाही. फक्त कॅन्सर मध्ये ताप येतो आणि ते एक लक्षण आहे यावर सर्व संशोधक ठाम आहेत. त्यामागची कारणे मात्र आजही शोधली जात आहेत.

हेही वाचा :  'जिंकलेल्या जागेवर बोलायचं नाही', संजय राऊतांनी काँग्रेसला स्पष्ट सांगितलं, 23 जागा लढण्यावर ठाम

(वाचा :- Blood Cleansing Foods : ही 5 लक्षणं सांगतात रक्त झालंय दुषित, विषारी घटकांचा कणन् कण बाहेर फेकतात हे 8 पदार्थ)​

रात्रीचा घाम येणे

रात्रीचा घाम येणे

ताप हे शरीरात होत असलेल्या इंफ्लेमेटरी रिएक्शनचे लक्षण आहे. जेव्हा शरीरात उष्णता वाढते तेव्हा आपले शरीर घामाने त्याचा प्रतिकार करते. हा शरीराचा मूळ स्वभाव आहे. जेवढा घाम येतो तेवढे शरीर लवकर थंड होते. हेच कारण आहे की कर्करोगाच्या रुग्णांना निदानापूर्वी अनेकदा हॉट फ्लॅशेज आणि रात्री घाम येणे ह्या समस्यांना सामोरे जावे लागते.
(वाचा :- पोट, मांडी, कंबरेची चरबी मेणासारखी वितळेल, खा हे 7 नॅच्युरल फॅट बर्नर पदार्थ, पोटात जाताच एक्स्ट्रा फॅट जाळतात)​

डॉक्टरांना कधी दाखवावे?

डॉक्टरांना कधी दाखवावे?

तापाकडे दुर्लक्ष न केलेलेच बरे. सौम्य ते तीव्र कसाही ताप असल्यास तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. संसर्ग किंवा तापाचे त्वरित निदान आणि त्यावर घेतलेले उपचार भविष्यात अधिक गंभीर समस्या होण्यास प्रतिबंध करतात. त्यामुळे कधीच तापाकडे सामान्य समस्या म्हणून बघून दुर्लक्ष करू नये.
(वाचा :- सावधान, फळांसोबत चुकूनही खाऊ नका हे 7 पदार्थ, पोटात बनते अ‍ॅसिडची भयंकर विषारी ज्वाला,किडनी होते कायमची निकामी)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा

हेही वाचा :  मासिक पाळीत होणाऱ्या असह्य वेदनांपासून ही 20 रुपयांची गोष्ट देईल आराम

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या वादात मोठा ट्विस्ट! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात हायकोर्टात याचिका

Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका …

कल्याण लोकसभेची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी; रस्त्यावर सापडले शेकडो मतदार ओळखपत्र

Kalyan Lok Sabha : ठाकरे गटाने कल्याण लोकसभेमधील संपूर्ण निवडणूक ही संशयास्पद असून पुन्हा एकदा …