ICSE बोर्डाकडून दहावी, बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी १० मिनिटांचा वेळ

ICSE Date Sheet: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (Nationa Testing Agency, NTA) इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षा जेईई मेन २०२२ (JEE Main 2022) च्या तारखा जाहीर केल्या. त्यानंतर आता विविध केंद्रीय आणि राज्य बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे. इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (Indian School Certificate Examinations,ICSE) म्हणजेच आयसीएसई बोर्डाने ३ मार्च २०२२ रोजी इयत्ता दहावी अर्थात आयसीएसई आणि इयत्ता बारावी म्हणजेच आयएससीच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

काऊन्सिलने जाहीर केलेल्या आयसीएसई सेमिस्टर २ च्या वेळापत्रकानुसार, इयत्ता दहावी आणि बारावीच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाची प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी अतिरिक्त १० मिनिटे दिली जाणार आहेत. परीक्षेचा कालावधी १ तास ३० मिनिटांव्यतिरिक्त हा वेळ असेल.

ICSE आणि ISC च्या परीक्षा २५ एप्रिलपासून
देशातील करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयसीएसई बोर्डातर्फे २०२१-२२ या वर्षासाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षांची घोषणा करण्यात आली.
यानुसार पहिल्या सत्राच्या परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ दरम्यान घेण्यात आल्या. दहावी, बारावी परीक्षेचा दुसरा टप्पा म्हणजेच सेमिस्टर २ च्या परीक्षा आता २५ एप्रिलपासून होणार आहेत. २० मेपर्यंत या परीक्षा सुरू राहणार आहेत. आयएससी परीक्षा ६ जूनपर्यंत होणार आहेत. काऊन्सिलच्या अधिकृत वेबसाइट cisce.org वर दिलेल्या लिंकवरून किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरून विद्यार्थी आयसीएसई सेमिस्टर २ चे वेळापत्रक डाउनलोड करून विषयनिहाय परीक्षेच्या तारखा माहिती करुन घेऊ शकतात.

हेही वाचा :  मुंबई नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती

ICSE and ISC SEM 2 2022: वेळापत्रक पाहण्यााठी ‘येथे’ क्लिक करा
JEE Main २०२२ मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो

JEE MAIN 2022: पहिल्या दिवशी ४० हजारांहून अधिक अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
सकाळी दहावीची आणि दुपारी बारावीची परीक्षा

आयसीएसईने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, इयत्ता दहावीची परीक्षा सकाळच्या शिफ्टमध्ये घेतली जाईल. जी सकाळी ११ वाजता सुरू होईल. मात्र, विद्यार्थ्यांना सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. इयत्ता बारावीचे सर्व पेपर दुपारी २ वाजल्यापासून होतील. ज्यासाठी दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी प्रश्नपत्रिका वितरित केल्या जातील.

CBSE, ICSE बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘या’ प्रकारे बनवा अभ्यासाचे वेळापत्रक
CBSE टर्म २ परीक्षा JEE Main सोबत क्लॅश, वेळापत्रकासंदर्भात अपडेट जाणून घ्या
फिल्मसिटीमध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या तपशील
सीबीएसई वेळापत्रकासंदर्भात अपडेट
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (Central Board of Secondary Education, CBSE) टर्म २ परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. माध्यमिक वर्गांच्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षांचे वेळापत्रक तसेच उच्च माध्यमिक वर्गांच्या टर्म २ परीक्षांचे वेळापत्रक अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर जाहीर करण्यात येणार आहे. याआधी सीबीएसई बोर्डाने २६ एप्रिलपासून परीक्षा सुरु होणार हे जाहीर केले होते. पण विषयानुसार परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले नव्हते.

हेही वाचा :  सीमा शुल्क आयुक्त कार्यालय मुंबई अंतर्गत कर्मचारी कार चालक पदांची भरती

Government Job: ओएनजीसीमध्ये विविध पदांची भरती, ‘येथे’ करा अर्ज
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रशासकीय विभागात भरती, २५ हजार ते १ लाखापर्यंत मिळेल पगार

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …