ICC women world cup 2022: अनिसा मोहम्मदची मोठी कामगिरी, 300 विकेट घेणारी पहिली गोलंदाज ठरली

ICC women world cup 2022 : आयसीसी महिला विश्वचषक (women cricket world cup) स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात वेस्ट इंडिजने (west indies) न्यूझीलंडवर (New zeland) तीन धावांनी रोमहर्षक विजय मिळवून स्पर्धेतील आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. या सामन्यात वेस्ट इंडिजची फिरकी गोलंदाज अनिसा मोहम्मदने (Anisa Mohammed) कारकिर्दीतील 300वी विकेट पूर्ण केली. यासह ती महिला क्रिकेटमध्ये 300 बळी घेणारी वेस्ट इंडिजची पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. ही कामगिरी करणारी अनिसा पहिली महिला फिरकी गोलंदाज ठरली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात त्याने 10 षटकात 60 धावा देऊन दोन विकेट घेतल्या होत्या.

झुलन गोस्वामी नंतर अनीसा आता 300 क्लबमध्ये पोहोचली
महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आजही भारतीय वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या नावावर आहे. झुलनने आतापर्यंत 345 आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत तर अनीसा आता 300 क्लबमध्ये पोहोचली आहे आणि अशी कामगिरी करणारा तो चौथा गोलंदाज ठरला आहे. महिला क्रिकेटमध्ये अनिसाच्या आधी केवळ तीन गोलंदाजांनी 300 विकेट घेतल्या होत्या. झुलन आणि अनिसाच्या आधी कॅथरीन ब्रंटच्या नावावर ३१२ आणि एलिस पेरीने ३०८ विकेट्स घेतल्या आहेत. अनिसा आता 300 बळी घेणारी वेस्ट इंडिजची पहिली महिला खेळाडू ठरली आहे.

हेही वाचा :  VIRAL VIDEO : साउथ सुपरस्टार विजयच्या 'हलमिथी हबीबो' गाण्यावर BTS बॅण्ड बॉईजचा डान्स, एकदा पाहाच | this fan made video of bts dancing to thalapathy vijays viral song halmithi habibo is a treat for fans dont miss prp 93

वेस्ट इंडिजची विजयी सुरुवात

ICC महिला विश्वचषक 2022 च्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने न्यूझीलंडचा तीन धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 9 बाद 259 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 256 धावांवर ऑलआऊट झाला. यजमानांना अखेरच्या षटकात सहा धावा करता आल्या नाहीत. 119 धावा करणाऱ्या 23 वर्षीय हेली मॅथ्यूजला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA

 

 

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …