IAF Recruitment 2022: इंडियन एअर फोर्समध्ये विविध पदांची भरती

IAF Recruitment 2022: भारतीय हवाई दलात दहावी आणि बारावी परीक्षा उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी निर्माण झाली आहे. आयएएफमध्ये शिकाऊ पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. एअरफोर्स अप्रेंटिस ट्रेनिंग (IAF Apprentice Training) लेखी परीक्षा A3TWT साठी ही भरती मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांना १९ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट indianairforce.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, या रिक्त पदासाठी १ मार्च २०२२ रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. तर प्रॅक्टीकल, परीक्षा ३ मार्च २०२२ रोजी घेतली जाणार आहे.

इंडियन एअर फोर्स स्टेशन ओझर (नाशिक) यांनी आयएएफ अप्रेंटिस ट्रेनिंग अभ्यासक्रमासाठी (IAF Apprentice Training Course)शिकाऊ पदाच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे पात्र उमेदवार भारतीय हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइट indianairforce.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ फेब्रुवारी आहे.

IAF Recruitment 2022: असा करा अर्ज
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट indianairforce.nic.in वर जा.
वेबसाइटच्या होमपेजवर Updates वर जा.
येथे Airforce Apprenticeship Training Technical Trades Recruitment 2022 लिंकवर क्लिक करा.
PROCEED TO REGISTER या लिंकवर क्लिक करा.
नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
नोंदणी क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने अर्ज भरा.
अर्जाची प्रिंट काढा.

हेही वाचा :  ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती

बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रशासकीय विभागात भरती, २५ हजार ते १ लाखापर्यंत मिळेल पगार

MMRDA Recruitment 2022: एमएमआरडीएत विविध पदांवर भरती
रिक्त जागांचा तपशील
मशीनिस्ट: ०४

शीट मेटल: ०७

वेल्डर गॅस आणि इलेक्ट: ०६

मेकॅनिक रेडिओ रडार विमान: ०९

सुतार: ०३

इलेक्ट्रिशियन विमान: १४

पेंटर जनरल: १

फिटर: २६

Army ADG Recruitment: अतिरिक्त डायरेक्टोरेट जनरल अंतर्गत विविध पदांची भरती
इस्टर्न कोलफिल्डमध्ये बारावी उत्तीर्णांना संधी, ३१ हजारपर्यंत मिळेल पगार

पात्रता आणि वयोमर्यादा
इंडियन एअर फोर्स स्टेशन ओझर (नाशिक) यांनी जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे दहावी, बारावी परीक्षेमध्ये ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे. तसेच आयटीमध्ये ६५ टक्के गुण असावेत. उमेदवारांचे वय १४ ते २१ वर्षे असावे.

या रिक्त पदावर १ एप्रिल २०२२ पासून सुरू होणाऱ्या शिकाऊ प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी लेखी परीक्षेसाठी (A3TWT) अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठी १ ते ३ मार्च २०२२ या कालावधीत परीक्षा घेण्यात येईल. तर निकाल १७ मार्च २०२२ रोजी लागणार आहे.

हेही वाचा :  राज्यातील 'या' शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये भरती

पदभरतीचा तपशील जाण्यासाठी येथे क्लिक करा

TCS Recruitment 2022: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये विविध पदांची भरती
NHM Recruitment: ‘या’ ५ जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत भरती

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सारस्वत बँकेत कनिष्ठ अधिकारी पदांची भरती

Saraswat Co-operative Bank Limited Invites Application From 150 Eligible Candidates For Junior Officer Posts. Eligible …

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत विविध पदांची भरती

Employees Provident Fund Organisation Invites Application From 2859 Eligible Candidates For Social Security Assistant & …