Honda ची नवी SUV लाँच; फोटो- फिचर्स पाहूनच कारच्या प्रेमात पडाल

Honda Elevate SUV : भारतीय ऑटो जगतामध्ये काही नवनवीन कार गेल्या बऱ्याच दिवसांमध्ये पाहायला मिळाल्या आहेत. यामध्ये एसयुवींना मिळणारी ग्राहकांची पसंतीही वाखाणण्याजोगी आहे. मुळात ग्राहकांची मिळकत आणि त्यानुसार कार खरेदीला प्राधान्य देण्याची त्यांची वृत्ती या गोष्टी एकंदरच Auto Sector मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. तुम्हीही या कारप्रेमींपैकीच आहात का? 

येत्या काळात तुम्हीही मिडसाईज आणि मिडरेंज एसयुवीच्या प्रेमात असाल, तर होंडाची नवी SUV तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. कारण, आता Honda नं नव्या एसयुवीसह त्यांच्या कार पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. जिथं, होंडाच्या सिटी आणि अमेजनंतर आलेल्या या कंपनीचं हे प्रोडक्ट चांगलंच चर्चेत आलं आहे. 

नव्या Honda Elevate SUV ची किंमत काय? 

अधिकृतरित्या सर्वांसमोर आलेली होंडा इलेवेट ऑगस्ट अखेरीस भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल. तेव्हाच या कारची खरी किंमत समोर येईल. तूर्तास सध्या जाणकारांच्या मते या कारची किंमत 10 ते 18 लाखांच्या दरम्यान असू शकते. 

भारतीय कार जगतामध्ये लाँच झाल्यानंतर या कारला ह्युंडई क्रेटा, किआ सेल्टोस, मारुती सुझुकी ग्रँड वितारा या आणि अशा इतर काही कारचं आव्हान असेल. त्यामुळं आता फिचर्सच्या बळावर ही कार दणदणीत नफा कमवते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

हेही वाचा :  मोठा दिलासा! खाद्यतेलाच्या दरात घसरण, आताच साठा करुन ठेवा

कारचे फिचर पाहूनच घ्या… 

स्ट्राँग हायब्रिड तंत्रासोबत या कारमध्ये 1.5 लीटर एटकिंसन सायकल पेट्रोल इंजिनचा पर्याय उपलब्ध असेल. या कारमध्ये सध्या 1.5-लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असून ते 212 बीएचपी पॉवर जनरेट करेल. कारमध्ये 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि सीवीटीही आहे. 

कारमध्ये लेवल-2 ADAS (एडवांस्ड ड्राइवर असिस्टेंस सिस्टम्स), कनेक्टेड कार फंक्शनलिटी आणि 10 इंचांचं टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टीम देण्यात आलं आहे. शिवाय त्यामध्ये एबीएस, सहा एअरबॅग्स, हिल होल्ड असिस्ट, रियर सीटबेल्ट रिमाइंडर असे फिचर्स देण्यात आले आहेत. Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Appleच्या वॉरंटी पॉलिसीमध्ये मोठा बदल; ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री?

Apple Warranty Check: Apple कंपनीने त्यांच्या रिपेअर आणि वॉरंटी पॉलिसीमध्ये बदल केले आहेत. कंपनीने या …

14 लाखांमध्ये 8 सीटर कार मिळत असताना का खरेदी करायची 5 किंवा 7 सीटर कार?

Best MPV 8 Seater Cars in India : भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये खासगी वाहनांना मिळणारी …