Holi 2022: यंदा होळीला पती-पत्नीने मिळून करा ‘हे’ उपाय, येईल वैवाहिक जीवनात सुख | Holi 2022: Very auspicious rare rajyoga some astro remedies can make married life happy


१७ मार्च रोजी होलिका दहनाच्या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती असेल, ज्यावरून तीन राजयोग तयार होत आहेत.

Holi 2022 : होळी आनंदाचा सण आहे. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून होळी साजरी केली जाते. १७ मार्च रोजी होलिका दहनाच्या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती असेल, ज्यावरून तीन राजयोग तयार होत आहेत. होलिका दहनाच्या दिवशी गुरू आणि चंद्राच्या संयोगाने ‘गजकेसरी योग’, लग्न, पाचव्या आणि नवव्या भावातील ग्रहांच्या संयोगाने ‘विरिष्ठा योग’ आणि ७ ग्रहांच्या उपस्थितीमुळे ‘केदार योग’ तयार होत आहे. हे तीन राजयोग अतिशय शुभ आहेत आणि आदर, कौटुंबिक सुख आणि समृद्धी, प्रगती आणि वैभव प्रदान करणारे मानले जातात.

ज्या पती-पत्नीच्या वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारचा त्रास आहे, ज्या लोकांना दीर्घकाळ आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो, त्यांनी या दिवशी काही खास उपाय करू शकतात. अशा शुभकाळात केलेले उपाय यशस्वी होतात असा समज आहे. येथे काही उपायांबद्दल जाणून घ्या.

हेही वाचा :  Maratha Reservation : मनस्ताप! मराठा सर्वेक्षणामध्ये पहिल्याच दिवशी अडथळे; आता नोंदी ठेवायच्या तरी कशा?

(हे ही वाचा: Holika Dahan 2022: राशीनुसार होळीमध्ये करा ‘या’ गोष्टी अर्पण, होऊ शकतो धनलाभ!)

वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी

वैवाहिक जीवनात सतत अडचणी येत असतील तर होलिका दहनाच्या रात्री उत्तर दिशेला एका स्लॅबवर पांढरे कापड पसरून मूग आणि हरभरा डाळ, तांदूळ, गहू, यांच्या ढिगाऱ्यापासून नवग्रह करावा. मसूर, काळे उडीद आणि तीळ या सर्वांची पूजा करून कुंकू तिलक लावावे. त्यानंतर दिवा लावावा. महादेव आणि माता पार्वतीचे ध्यान करा आणि तुमच्या जीवनातील समस्या दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करा. हा उपाय पती-पत्नीने मिळून करा. यामुळे तुमच्या आयुष्यातील समस्या हळूहळू दूर होऊ लागतील.

(हे ही वाचा: Holi 2022: होळी का पेटवली जाते? जाणून घ्या कारण)

वैवाहिक जीवन आनंदी करण्यासाठी

वैवाहिक जीवन सुखकर बनवायचे असेल तर या दिवशी सुके खोबरे घेऊन त्यात साखर भरावी. यानंतर हा नारळ होलिकेच्या अग्नीत टाकावा. यानंतर पती-पत्नीने मिळून सात वेळा होलिकेची प्रदक्षिणा करावी. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातील दु:ख दूर होऊन जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल.

(हे ही वाचा: Happy Holi Marathi Message: होळीनिमित्त प्रियजनांना पाठवा ‘हे’ खास शुभेच्छा मेसेज!)

हेही वाचा :  ISRO ने गाठला आणखी एक मोठा टप्पा; Chandrayan 3 ची Deboosting प्रक्रिया यशस्वी

आर्थिक संकट सोडवण्यासाठी

सर्व प्रयत्न करूनही तुमच्या घरातील आर्थिक संकट संपत नसेल, तर होलिका दहनाच्या रात्री पती-पत्नी चंद्राच्या प्रकाशात उभे राहून ताटाला स्पर्श करून माखाणे घेऊन तुपाचा दिवा लावतात. यानंतर चंद्राला दूध अर्पण करून दिवे व अगरबत्ती दाखवावी. पौर्णिमेच्या रात्री असे केल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी येते.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलं ‘जय श्री राम’, शिक्षकाने केलं पास.. विद्यापिठाकडून कारवाई

Trending News : उत्तर प्रदेशमधल्या जौनपूर इथल्या वीर बहाद्दूर सिंह पूर्वांचल युनिव्हर्सिटीतल्या उत्तर पत्रिका तपासणीतल्या …