हरिस रौफनं सर्व मर्यादा ओलांडल्या; कॅच सोडणाऱ्या खेळाडूच्या भरमैदानात कानशिलात लगावली

Haris Rauf slaps Kamran Ghulam: लाहोरमध्ये खेळल्या जात असलेल्या पाकिस्तान सुपर लीग (PSL 2022) च्या सामन्यात वेगवान गोलंदाज हारिस रौफनं  (Haris Rauf)  कॅच सोडणाऱ्या खेळाडूच्या कानशिलात लगावली आहे. हरिस रौफचे हे कृत्य पाकिस्तानी चाहत्यांनाही आवडलं नाही. सोशल मीडियावर त्याच्यावर टीका केली जात आहे. लाहोर कलंदर आणि पेशावर झाल्मी यांच्यात सोमवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात ही घटना घडली. 

पाकिस्तान सुपर लीगच्या शेवटच्या सामन्यात पेशावर झाल्मी आणि लाहोर कलंदर यांच्यातील सामना खूपच रोमांचक झाला. दरम्यान, हारिस रौफनं विकेट घेतल्यानंतर लाहोर कलंदरचा खेळाडू कामरान गुलाम याच्या कानशिलात लगावली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सामन्याच्या पहिल्या डावात हरिफ रौफ गोलंदाजीसाठी आला. तेव्हा कामरान गुलामनं त्याच्या पहिल्याच षटकात हजरतुल्लाचा झेल सोडला.त्याच षटकातील पाचव्या चेंडूवर त्यानं मोहम्मद हॅरिसला झेलबाद केलं. त्यावेळी सर्व खेळाडू आनंद साजरा करण्यासाठी त्याच्याकडं आले.तेव्हा रौफनं कामरान गुलामला कानाखाली मारली. 

व्हिडिओ-

हारिसच्या या कृतीनं सहकारी खेळाडूंना धक्काच बसला. मात्र, यावेळी कामरान गुलाम यांनीही समजूतदारपणा दाखवला. पण हरिस रौफच्या या वृत्तीनं पाकिस्तानचे चाहते चांगलेच संतापले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओवर क्रिकेटचाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव केला जात आहे.

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

धोनी IPL मधूनही रिटायर्ड होणार? रविवारी करणार मोठी घोषणा, पाहा धोनीची ‘ती’ पोस्ट

मुंबई, 24 सप्टेंबर: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या क्रिकेटपासून दूर आहे. पण धोनीनं …

पाकविरुद्धच्या सामन्यात थोडक्यात बचावला इंग्लंडचा ब्रूक, Video पाहून बसेल धक्का

कराची, 24 सप्टेंबर: इंग्लंडचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. आगामी टी20 वर्ल्ड कपआधी या दौऱ्यात …