Hanuman Phal Benefits: नावाइतकंच शक्तीशाली आहे हे छोटंसं फळ, पोट साफ ठेवण्यासोबतच कॅन्सर व डायबिटीजचा करतं नाश

फळे ही खाल्लीच पाहिजेत कारण फळे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जे लोक फळे पाहून नाकं मुरडतात ते आपल्या शरीराचे आरोग्यच धोक्यात घालत आहेत असे म्हटले तरी वावगे ठरू नये. फळांचे विविध प्रकार आहेत आणि सर्व फळांचे स्वतःचे वेगळे फायदे आहेत. बहुतेक लोकांना सफरचंद, केळी, द्राक्षे आणि संत्री या फळांचे फायदे माहित आहेत, परंतु एक असे फळ आहे जे या सर्वांपेक्षा आधी उपयुक्त आहे आणि त्याचे आरोग्यासाठी प्रचंड फायदे आहेत. Soursop नावाचे हे फळ भारतात ‘हनुमान फळ’ म्हणून देखील ओळखले जाते.

हे फळ आपल्या उत्कृष्ट चचीसाठी आणि शक्तिशाली आरोग्यदायी फायद्यांसाठी ओळखले जाते. त्याचे वैज्ञानिक नाव Annona muricata आहे, पण त्याला अनेक नावे आहेत. हे फळ guanabana, पंजा-पंजा आणि graviola म्हणून देखील ओळखले जाते. हे फळ कस्टर्ड सफरचंद कुटुंबाचा भाग म्हणून ओळखले जाते. या मोठ्या अंडाकृती आकाराच्या फळाचा बाहेरचा भाग हिरवा आणि आतील भाग पांढरा असतो. त्यावर काटे असतात. होलिस्टिक न्यूट्रिशनिस्ट अझहर अली सय्यद यांनी या फळाचे काही फायदे सांगितले आहेत. (फोटो सौजन्य :- iStock)

हेही वाचा :  जर पुतीन यांना परदेशात अटक करण्याचा प्रयत्न केला तर...; रशियाची संपूर्ण जगाला जाहीर धमकी

हनुमान फळातील पोषक तत्वे

हनुमान फळातील पोषक तत्वे

हनुमान फळ हे Vitamin C चे चे भांडार आहे, हे एक असे शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी ओळखले जातो. या फळामध्ये आणि त्याच्या पानांमध्ये फायटोस्टेरॉल, टॅनिन आणि फ्लेव्होनॉइड्ससह इतर अनेक अँटिऑक्सिडंट्स आढळतात. अँटिऑक्सिडंट्स तुमच्या एकूण आरोग्यामध्ये चांगली भूमिका बजावतात आणि विविध आरोग्य समस्यांपासून संरक्षण करण्यात मदत करू शकतात.

(वाचा :- लघवीत हा रंग दिसणं म्हणजे किडनीच्या कॅन्सरची सुरूवात? डॉ. सांगितली किडनीच्या कॅन्सरची 10 ठोस लक्षणं, व्हा सावध)​

पचनक्रिया राहते हेल्दी

पचनक्रिया राहते हेल्दी

हनुमान फळ हे फायबरचा उत्तम स्रोत आहे. फायबर हे पचनाच्या आरोग्यासाठी आवश्यक पोषक तत्व आहे. फायबरमुळे पचन नीट होते आणि आतड्याचे कार्य अधिक चांगल्या प्रकारे सुरू राहते. याशिवाय बद्धकोष्ठता सारख्या पाचन समस्या टाळण्यास देखील हनुमान फळ मदत करते. त्यामुळे जर तुम्हाला पचन संबंधित कोणतीही समस्या असेल तर आवर्जून हनुमान फळाचे सेवन करून पहा.

(वाचा :- परवेझ मुशर्रफनी 7 वर्ष किडनी, लिव्हर, हार्टच्या नसा ब्लॉक करणा-या आजाराशी दिला लढा, या 10 लक्षणांनी केलं तांडव)​

कॅन्सरचा धोका होतो कमी

कॅन्सरचा धोका होतो कमी

हनुमान फळामध्ये अँटी-कॅन्सर गुणधर्म असतात. त्याचा वापर कॅन्सरच्या प्रतिबंध आणि उपचारात मदत करू शकतो. एका अभ्यासानुसार, हनुमानाच्या फळांचा रस स्तनाच्या कर्करोगाचा ट्यूमर कमी करू शकतो आणि कर्करोगाच्या पेशी नष्ट करू शकतो हे सिद्ध झाले. एवढेच नाही तर त्याचा रस ल्युकेमिया पेशी तयार होण्यापासून रोखू शकतो हे देखील दिसून आले आणि म्हणूनच हनुमान फळाला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे.

हेही वाचा :  COVID Mask : घाणेरडा मास्क वापरण्याची चूक अजिबात करू नका, थेट फुफ्फुसापर्यंत पोहचेल इनफेक्शन, मास्क एक्सपायर झाला हे कसं ओळखावं?

(वाचा :- पोटात बनतो गॅस-अ‍ॅसिडिटी? लगेच चघळा ही गोष्ट, पचनक्रिया मजबूत व डायबिटीज-कोलेस्ट्रॉलसारखे 10 आजार होतील छुमंतर)​

अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध

 अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध

अझहर अली यांच्या मते, या फळामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि हनुमान फळाचा रस विविध प्रकारचे बॅक्टेरिया नष्ट करू शकतो, ज्यात कॅव्हिटी आणि हिरड्यांच्या आजाराला कारणीभूत असणाऱ्या बॅक्टेरियांचा देखील समावेश असतो. असणारे. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की या फळाचा रस कॉलराविरूद्ध देखील प्रभावी असू शकतो.

(वाचा :- पोट साफ न झाल्याने आतडी जातात पूर्ण सडून, दुधात मिसळून प्या हा एक पदार्थ, झटक्यात बाहेर पडेल पोटातील सर्व घाण)​

सूज कमी करण्यास सहाय्यक

सूज कमी करण्यास सहाय्यक

या फळामध्ये अँटी-इनफ्लेमेट्री गुणधर्म असतात. हेच कारण आहे की हनुमान फळातील घटक हे सूज कमी करण्यास सक्षम ठरतात. दीर्घकालीन आजारांमुळे निर्माण झालेली सूज आणि जळजळ देखील या फळाच्या सेवनाने दूर होऊ शकते. संधिवातासारख्या दाहक रोगांवर उपचार करण्यासाठी हनुमान फळ अत्यंत उपयुक्त ठरू शकते.

(वाचा :- Cancer Early Sign: ही 5 लक्षणं ओरडून सांगतात झाली आहे कॅन्सरची सुरूवात, Stage 1 आधीच करा ही 7 कामे, वाचेल जीव)​

हेही वाचा :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव सन्मान पुरस्कार जाहीर; साताऱ्यात होणार भव्य सत्कार

रक्तातील साखर येऊ शकते नियंत्रणात

रक्तातील साखर येऊ शकते नियंत्रणात

अजहरने यांनी काही प्राण्यांवर केल्या गेलेल्या चाचण्यांचा अहवाल देत सांगितले की, हनुमान फळामध्ये रक्तातील साखर नियंत्रित करण्याची क्षमता आहे. निरोगी आहार आणि सक्रिय जीवनशैलीसह जर हनुमान फळाचे नियमित सेवन केले तर ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते.

(वाचा :- रोज या 5 चुका करणारे लोक खेळतायत स्वत:च्या जीवाशी जीवघेणा खेळ, दुसरी चूक अत्यंत घातक, आजच सोडा नाहीतर..! )

डिस्क्लेमर: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींच्या मनमानीविरुद्ध..’, ‘सत्तेतले नक्षलवादी’ म्हणत ठाकरे गटाची शिंदे-फडणवीस, मोदी-शाहांवर टीका

Urban Naxal Issue: शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कठोर शब्दांमध्ये टीकास्र सोडलं …

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं

Maharashtra Weather News : मान्सूननं (Monsoon) देशात हजेरी लावल्यानंतर दक्षिणेकडील राज्य आणि महाराष्ट्राचा काही भाग …