‘गुलाबाची कळी कशी…’ रिंकूच्या गुलाबी लुकवर चाहते फिदा

रिंकू राजगुरूने ‘सैराट ’ चित्रपटातून आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने अनेक चाहते निर्माणे केले. तिच्या सोशल मीडिया पेजवर चाहत्यांची संख्या वाढतच चालली आहे. नुकतेच रिंकूने गुलाबी साडीतील फोटो पोस्ट केले असून चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केल्याचे दिसून येत आहे.

रिंकू नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो पोस्ट करत असते. त्यातही रिंकूच्या फोटोंमध्ये पारंपरिकता भरभरून असते. रिंकूचा हाच साधेपणा आणि निरासगसता चाहत्यांना आपलीशी वाटते. हातात गुलाबी रंगाचे गुलाब घेऊन रिंकूने पोस्ट केलेले फोटो सध्या व्हायरल होत आहेत. पाहूया रिंकूचा हा मन वेधणारा लुक (फोटो सौजन्य – @iamrinkurajguru Instagram)

सिल्व्हर बुट्ट्यांची गुलाबी सिल्क साडी

सिल्व्हर बुट्ट्यांची गुलाबी सिल्क साडी

रिंकूने सुंदर अशी सिल्व्हर बुट्ट्या आणि बॉर्डर असणारी गुलाबी सिल्क साडी नेसली आहे. यासह तिने मॅचिंग असा बॉर्डरसह ब्लाऊज घातला असून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. जुन्या जमान्यातील अभिनेत्रींचा लुक असावा इतकीच सुंदर रिंकू दिसून येत आहे तर यासह तिने हातात त्याच रंगाचे गुलाब घेऊन अधिक आकर्षकता आणली आहे.

हेही वाचा :  मुलासाठी अजित पवार यांचा सेफ गेम?पार्थ पवारांचे राजकारणात लाँच करण्याचा प्रयत्न

लाल खड्यांचा नेकलेस आणि कानातले

लाल खड्यांचा नेकलेस आणि कानातले

या साडीसह अधिक दागिन्यांचा लुक न करता रिंकूने गुलाबी साडीला मॅच होतील असे लाल आणि मोती रंगाच्या खड्याचा नेकलेस आणि कानातले घातले आहेत. तर नाकात चमकी घालून लुक पूर्ण केला आहे. कोणत्याही सणासाठी हा लुक आकर्षक ठरू शकतो.

(वाचा – Oscars 95: दीपिका पादुकोणचा ब्लॅक ऑफ-शोल्डर लुक आणि नव्या नेक टॅटूने वेधले लक्ष )

आंबाडा आणि माळलेले गुलाब

आंबाडा आणि माळलेले गुलाब

रिंकूने यासह हेअरस्टाईलसाठी आंबाडा लुक केला असून त्यात लाल गडद आणि गुलाबी रंगाचे गुलाब माळले आहे. आंबाड्याचा एका बाजूला हे गुलाब माळलेल्या रिंकूच्या लुकने या साडीला चारचाँद लावले आहेत.

(वाचा – हिरवीकंच नऊवारी आणि बंधगळा लुक सोनाली – आशयचा राजेशाही थाट, पारंपरिक लुकने वेधले लक्ष)

काजळ, टिकली आणि नैसर्गिक मेकअप

काजळ, टिकली आणि नैसर्गिक मेकअप

या साडीला परफेक्ट लुक देण्यासाठी रिंकूने नैसर्गिक मेकअपचा आधार घेतला. काजळ, आयलायनर, बेसिक मेकअप आणि गुलाबी रंगाच्या साडीला मॅच करण्यासाठी गडद गुलाबी शेड्समधील लिपस्टिक आणि कपाळावर बारीकशी टिकली असा लुक पूर्ण केला.

(वाचा – सिल्व्हर सिक्विन ब्रालेट आणि सेफ्टी पिन्स शॉर्ट्समध्ये नोरा फतेहीचा अचंबित करणारा लुक, इंटरनेरवर लावली आग)

हेही वाचा :  मखमली गुलाबी कपड्यामध्ये केरळमधील ट्रान्सजेंडरच्या बाळाची पहिली झलक

नैसर्गिक लुकवर भर

नैसर्गिक लुकवर भर

रिंकूने नेसलेल्या या साडीकडे पाहून सर्वच चाहते फिदा झाले आहेत. नैसर्गिक लुकमुळे तिच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे. तर तिच्या चाहत्यांनी दिला महाराष्ट्राची अप्सराच म्हटले आहे. तर काहींनी तिला स्मिता पाटील असेही म्हटले आहे.

तुम्हीही गुढीपाडव्यासाठी रिंकूच्या या साडी लुकवरून प्रेरणा घेऊ शकता. साधा मात्र तितकाच एलिगंट हा लुक अत्यंत आकर्षक आणि सुंदर आहे.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

PM साठी फुटपाथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का नाही? हायकोर्टाचा सवाल; म्हणाले, ‘चालण्याची जागा मूलभूत अधिकार’

Bombay High Court On Footpaths Streets: मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी एका प्रकरणासंदर्भात भाष्य करताना पंतप्रधान आणि …

Maharashtra Weather News : किनारपट्टीसह पश्चिम घाटात सरीवर सरी; मुंबईत मात्र काळ्या ढगांचा चकवा, पाऊस गेला तरी कुठं?

Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्येराज्याच्या कोकण किनारपट्टी भागांमध्ये पावसाची हजेरी …